‘पॉट्स शंट’ शस्त्रक्रियेने १७ वर्षीय मुलीला दिले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:35 AM2020-03-03T05:35:52+5:302020-03-03T05:35:55+5:30

गल्फ निवासी असलेल्या १७ वर्षीय साराला अचानक चक्कर आल्याने डॉक्टरांकडे तपासण्या केल्या.

Pots Shunt Surgery Survival Gives Life to 17 Year Old Girl | ‘पॉट्स शंट’ शस्त्रक्रियेने १७ वर्षीय मुलीला दिले जीवनदान

‘पॉट्स शंट’ शस्त्रक्रियेने १७ वर्षीय मुलीला दिले जीवनदान

Next

मुंबई : गल्फ निवासी असलेल्या १७ वर्षीय साराला अचानक चक्कर आल्याने डॉक्टरांकडे तपासण्या केल्या. वैद्यकीय अहवालात रक्तप्रवाह नेहमीपेक्षा पाचपट अधिक होत असल्याने मेंदू व शरीराच्या इतर अवयवांना रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता. या वैद्यकीय स्थितीला ‘पल्मनरी हायपरटेन्शन’ म्हणतात. यावर तुर्की येथील रुग्णालयात उपचार होत नसल्याचे सांगितल्याने पालकांनी मुंबई गाठली. मुलुंड खासगी रुग्णालयातील तज्ज्ञांनी ‘पॉट्स शंट’ शस्त्रक्रियेच्या साहाय्याने उपचार करून जीवनदान दिले.
याविषयी बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय मालणकर यांनी सांगितले, या आजारामुळे तिच्या हृदयाची उजव्या बाजूची पंपिंग क्षमता खालावली होती. तिला त्वरित फुप्फुस व हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत समाविष्ट केले. तिच्यावर पॉट्स शंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यात छातीच्या आतमध्ये एक नलिका ठेवली जाते. ही नलिका उच्च दाबासाठी पंपिंगप्रमाणे कार्य करते आणि उजव्या बाजूच्या वेन्ट्रिकलचे पंपिंग कार्य सुलभ करते. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या शरीरामध्ये ०.१ मिमी जाड झडप बसवली. यामुळे फुप्फुसातील धमनीमधून महाधमनीमध्ये होणारा रक्तपुरवठा सुरळीत झाला आणि महाधमनीमधून फुप्फुसातील धमनीमध्ये होणाऱ्या रक्तपुरवठ्याला प्रतिबंध झाला.
>सहा महिन्यांनी भारतात आणणार
शस्त्रक्रियेच्या १२ दिवसांनंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तिने अनिश्चित, पण हळूहळू पावले उचलण्यास सुरुवात केली. शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीदरम्यान तिने चांगला प्रतिसाद दिला. मुलीला तपासणीसाठी सहा महिन्यांनंतर भारतात आणणार आहेत.

Web Title: Pots Shunt Surgery Survival Gives Life to 17 Year Old Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.