मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषणाचा स्तर वाढत असतानाचा दुसरीकडे थंडीचा कहर देखील वाढत आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईत विभागीय स्तरावर पवई येथे १८.५८ अंश एवढया किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात परभणी येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, हे किमान तापमान १४.९ अंश सेल्सिअस एवढे आहे. १८ ते २१ या काळात गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहील तर मुंबईत शुक्रवारसह शनिवारी आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या अनेक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
---------------
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.पुणे १५.८जळगाव १६.७मालेगाव १७.६नाशिक १६सातारा १६.९औरंगाबाद १६.४अकोला १७.५परभणी १४.९बुलढाणा १६गोंदिया १६.६नागपूर १६.५वाशिम १६वर्धा १७.४
---------------
मुंबई विभागीय स्तरावरील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
पवई १८.५८कांदिवली १९.१८मालाड, चारकोप, मुलुंड आणि नेरुळ येथील किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे.