Join us

पवई : डोंगरावरून हरीण घरात पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:11 PM

पवई येथील रहिवासी सविता सिंग यांच्या घराच्या पत्र्याहून एक हरिण त्यांच्या घरात पडल्याची घटना घडली.

 

पवई येथील रहिवासी सविता सिंग यांच्या घराच्या पत्र्याहून एक हरिण त्यांच्या घरात पडल्याची घटना घडली. येथील स्थानिक रहिवासी आबा कुबल यांनी याची माहिती प्राणी मित्र संघटना पॉजला दिली. घटनेची माहिती मिळताच पॉजचे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू हे घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली.

 

 

वनविभागाचे पथक वनपाल रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या हरणास प्राणी मित्रांनी पकडले. शिवाय पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, लगतच्या राष्ट्रीय उद्यानातील प्राणी येथील मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यापूर्वीही येथे टेकडीवरून हरिण पडल्याची घटना घडली होती, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी दिली.  

 

टॅग्स :पर्यावरणमुंबई