मुंबई : शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांकडून छोट्या-मोठ्या कारणांसाठी बॅनरबाजी केली जाते, पण राजकीय बॅनरमुळे पवई येथे एल अँड टी परिसरात असणारा सिग्नल दिसेनासा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पवई येथील एल अँड टी सिग्नलजवळ दोन बॅनर लावण्यात आले आहेत, यामध्ये एक बॅनर शिवसेनेचा तर दुसरा बॅनर हा भाजपचा आहे, पण या बॅनरमुळे एल अँड टी येथील सिग्नल झाकला गेला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या ठिकाणी वाहतूककोंडी होते. त्यामुळे त्या बॅनरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई नाहीपवई येथे एल अँड टी सिग्नलवर जे बॅनर आहेत, त्यामुळे सिग्नल दिसत नसून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात पालिकेकडे दोन वेळा तक्रार केली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. - जयवंत सकपाळ, पोलीस निरीक्षक, साकीनाका वाहतूक विभाग.