पवई तलाव ओव्हरफ्लो; ५४५ कोटी लीटर क्षमता असूनही पाणी पिण्यास अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:44 AM2024-07-09T06:44:06+5:302024-07-09T06:44:13+5:30

गेल्या तीन दिवसांत पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पडक्रस इाला त्यामुळे हा तलाव भरून वाहू लागला

Powai lake in the Mumbai Municipal Corporation area started overflowing on Monday morning | पवई तलाव ओव्हरफ्लो; ५४५ कोटी लीटर क्षमता असूनही पाणी पिण्यास अयोग्य

पवई तलाव ओव्हरफ्लो; ५४५ कोटी लीटर क्षमता असूनही पाणी पिण्यास अयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई:मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलातांपैकी महत्वाचा असलेला पवई तलाव सोमवारी पहाटे ४:४४च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्ध वसाहतीत इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसांत पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पडक्रस इाला त्यामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तलावाविषयी...
• पालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे २७ मैल) अंतरावर आहे.
• या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८९० मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये खर्च आला होता.
• या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
• तलाव पूर्ण भरतो तेव्हा त्यात ५४५.५ कोटी लीटर म्हणजे ५४५५ दशलक्ष लिटा पाणीसाठा असतो. हा तलाव वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.

Web Title: Powai lake in the Mumbai Municipal Corporation area started overflowing on Monday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.