Join us

बीडीडीएसचा पराक्रम व्यर्थच

By admin | Published: November 26, 2014 2:30 AM

26/11 हल्ल्याला सहा वष्रे पूर्ण झाली. मात्र त्या काळरात्री अचाट पराक्रम करून हजारोंचे प्राण वाचविणारे मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाला अजूनही शाब्बासकीची प्रतीक्षा आहे.

केंद्राने पदक नाकारले : बॉम्बशोधक व नाशक पथकाला शाब्बासकीची प्रतीक्षा 
जयेश शिरसाट - मुंबई
26/11 हल्ल्याला सहा वष्रे पूर्ण झाली. मात्र त्या काळरात्री अचाट पराक्रम करून हजारोंचे प्राण वाचविणारे मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाला अजूनही शाब्बासकीची प्रतीक्षा आहे. तब्बल आठ किलो आडीएक्सने भरलेले चार शक्तिशाली बॉम्ब आणि वीसेक हॅण्डग्रेनेड निकामी करणा:या या पथकाला केंद्र शासनाने शौर्यपदक नाकारले.
मुंबईकरांना या हल्ल्याची आठवण फक्त 26 नोव्हेंबरलाच होते. मात्र इथे बॉम्ब पेरलाय, तिथे संशयास्पद वस्तू आढळली आहे या निनावी फोनवरून मिळालेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा करताना बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) प्रशिक्षित अधिकारी, कर्मचा:यांना 26/11ची रात्र आठवते. 
हा अतिरेकी हल्ला आहे, अतिरेक्यांनी हॉटेल ताज, ट्रायडेन्ट आणि नरिमन हाउस कब्जात घेतले आहे हे स्पष्ट होताच बीडीडीएस पथक प्रशिक्षित श्वानांसह तेथे दाखल झाले. तेव्हा हॉटेल ताज, ट्रायडेन्टमधे दडून बसलेले अतिरेकी खाली जमलेल्या पोलिसांवर गोळ्या झाडत होते, ग्रेनेड फेकत होते. त्याही अवस्थेत बीडीडीएसच्या प्रीन्स या प्रशिक्षित श्वानाने दोन्ही हॉटेलबाहेर पेरलेले चार बॉम्ब शोधले. त्यापैकी एक बॉम्ब फुटला. मुळात प्रीन्सने तो बॉम्ब आहे हे ओळखल्याने जवळपास असलेले बीडीडीएसचे अधिकारी, कर्मचारी लांब झाले. त्यामुळेच वाचले. उर्वरित तीन बॉम्ब मात्र त्या युद्धसदृश परिस्थितीतही बीडीडीएसने निकामी करून मोठी जीवित हानी टाळली होती. हा पराक्रम गाजविणा:या बीडीडीएसच्या 19 जणांच्या टीमला पोलीस महासंचालकांनी पदक देऊन गौरविले. या पथकाचा केंद्र सरकारही शौर्यपदक देऊन सन्मान करेल, अशी अपेक्षा होती. आश्चर्य म्हणजे या मानाच्या पदकासाठी याच पथकाला धडपड करावी लागली. तसा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत गृहविभागाला धाडण्यात आला. गृहविभागाने तो पुढे केंद्राकडे धाडला. मात्र केंद्राने या पथकाला पदक नाकारले.
या पथकाला पदक का नाकारले म्हणून केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली. न्यायालयाने अनेकदा केंद्राला पदक न देण्यामागचे कारण काय याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. मात्र या पथकाला पदक देणार नाही असे न्यायालयात स्पष्ट करणा:या केंद्र सरकारने अद्याप त्यामागील कारण दिलेले नाही. 
 
दिवसाला 2-3 अफवा : बेवारस वस्तू, बॉम्बच्या अफवा असे दिवसाला सरासरी दोन ते तीन कॉल बीडीडीएसला येतात. यापैकी कोणताही कॉल कमी लेखता येत नाही. प्रत्येक कॉलवर घटनास्थळी जाऊन बेवारस वस्तूची झाडाझडती घेतली जाते.
 
रक्तदान शिबिराचे आयोजन : मुंबईवरील दहशतवादी 
हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचा:यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री साईप्रसाद उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नायगाव येथील पोलीस मुख्यालयातील चाळ क्रमांक 9 येथे सकाळी 9 ते सायंकाळी 4 र्पयत हे रक्तदान 
शिबिर पार पडेल.
 
मुंबईसाठी एकच डिस्पोझल व्हॅन 
अतिरेक्यांनी एकाचवेळी शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब पेरले तर मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) ते निकामी करण्यात कदाचित अपयशी ठरेल. कारण सुमारे सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी बीडीडीएसकडे फक्त एकच डिस्पोझल व्हॅन आहे.  26/11च्या हल्ल्यात हॉटेल ताजजवळ अतिरेक्यांनी एकाच परिसरात बॉम्ब ठेवल्याने डिस्पोझल व्हॅनला तिन्ही बॉम्ब निकामी करणो शक्य झाले. मात्र एकाचवेळी शहर आणि उपनगरात बॉम्ब सापडला तर अतिरिक्त व्हॅन नसल्याने एकाचवेळी दोन्ही बॉम्ब निकामी करणो कठीण होऊन जाईल, अशी माहिती सूत्रंकडून मिळते. त्यातच या पथकात मनुष्यबळही कमी आहे. 
 
सीसीटीव्ही योजनाही अजून कागदावरच!
26/11 हल्ल्यानंतर मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाच्या मॉर्डनायझेशनचे वारे वाहू लागले. तत्कालीन आघाडी सरकारने सुरक्षा उपाययोजनांच्या आश्वासनांचा पाऊस पाडला. त्यात शहरात 5 हजार सीसीटीव्हींचे जाळे या उपक्रमाचाही सहभाग होता. हल्ल्याला सहा वष्रे लोटली तरी हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमात हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असे सूतोवाच केले. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार नुसते सीसीटीव्ही उभारून चालणार नाही, तर प्रत्येक सीसीटीव्ही चित्रण पाहून कारवाई करणारी यंत्रणा आकार घ्यायला हवी. जर ही यंत्रणा उभी राहिली नाही, तर या 5 हजार सीसीटीव्हींचा काहीही उपयोग नाही. सीसीटीव्हींचा वापर बॉम्ब कोणी पेरला हे शोधण्याइतपत मर्यादित असेल. दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी सीसीटीव्हींचा उपयोग होणार नाही. दादरसारख्या स्थानकावरील नियंत्रण कक्षात मध्यंतरी एसी नव्हता. तसेच प्रत्येक क्षण एलईडी स्क्रीनवर नजर ठेवणो कर्मचा:यांना शक्य होत नाही.  यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागेल, असा दावाही तज्ज्ञांनी केला आहे.