मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे मेल / एक्स्प्रेस गाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत. तर ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार आहे.मध्यरात्री १२:३० ते सकाळी ०४:३० या वेळेत दोन्ही दिवशी प्रत्येकी ४ तास ब्लॉक भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर तर वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन्सवर असणार आहे. १९ व २० एप्रिल आणि २० व २१ एप्रिल रोजी मुख्य लाईनवर ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाउन धीमी लाईन एन वन शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१४ कसारा करिता सुटेल आणि कसारा येथे ३ वाजता पोहचेल. ब्लॉक नंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ४:४७ कर्जत करिता सुटेल आणि ६:०७ वाजता कर्जत येथे पोहचेल. अप स्लो लाईनवरून ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल एस ५२ कल्याण येथून २२:३४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ००:०६ वाजता पोहचेल. ब्लॉक नंतर पहिली लोकल अप स्लो लाईनवर टी २ ठाणे येथून ४:०० सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४:५६ वाजता पोहचेल.
हार्बर लाईनवर १९ व २० एप्रिल आणि २० व २१ एप्रिल रोजी काय ?- ब्लॉक पूर्वीची पहिली लोकल सीएसएमटी येथून ००:१३ सुटेल आणि पनवेल येथे ०१:३३ वाजता पोहचेल.- ब्लॉक नंतरची पहिली लोकल सीएसएमटी येथून ०४:५२ सुटेल आणि पनवेल येथे ०६:१२ वाजता पोहचेल. - ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून २२:४६ सुटेल आणि सीएसएमटी येथे ००:०५ वाजता पोहचेल. - ब्लॉक नंतरची शेवटची लोकल वांद्रे येथून ०४:१७ सुटेल आणि सीएसएमटी येथे ०४:४८ वाजता पोहचेल.
दादर स्थानकावर या गाड्या स्थगित केल्या जातील१२८७० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस१२०५२ मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस२२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस११०५८ अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस१२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल