वीज ग्राहकांनो राहा सावधान! अन्यथा बँक खाते होईल रिकामे, कसं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:50 AM2022-06-13T08:50:29+5:302022-06-13T08:50:57+5:30

वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे.

Power consumers beware Otherwise the bank account will be empty read here | वीज ग्राहकांनो राहा सावधान! अन्यथा बँक खाते होईल रिकामे, कसं? वाचा...

वीज ग्राहकांनो राहा सावधान! अन्यथा बँक खाते होईल रिकामे, कसं? वाचा...

googlenewsNext

मुंबई :

वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवून वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे. याला वीज ग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट एसएमएसना वीजग्राहकांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस नागरिकांना पाठविण्यात येत आहेत; मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे एसएमएस व व्हॉट्सॲप मेसेज पाठविण्यात येत नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात. त्याचा सेंडर आयडी हा एमएसईडीसीएल असा आहे. अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही, असेही महावितरणने कळविले आहे.

शंका असल्यास काय कराल?
काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा.

नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच एसएमएस
मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच एसएमएसद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

 हे करू नका
- वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे, असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहे.
- मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठविण्यात येत आहे.
- ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे.
- ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे.

Web Title: Power consumers beware Otherwise the bank account will be empty read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज