Join us

वीज ग्राहकांनो डिजिटल माध्यमांचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:10 AM

मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबई लिमिटेडने ३० लाख ग्राहकांना आवाहन केले आहे, की ...

मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबई लिमिटेडने ३० लाख ग्राहकांना आवाहन केले आहे, की सध्या डिजिटल सेवांचा वापर केल्यास, सुरक्षित राहून कोविड - १९चा सामना करता येईल. अदानी इलेक्ट्रिसिटी मोबाईल ॲप डाऊनलोड करून, वीज वापर, मीटर रिडिंग सबमिट करणे, वीज प्रवाह खंडितसंबंधी माहिती, वीज प्रवाह नसल्यासंबंधी तक्रारीची स्थिती जाणून घेणे, नवीन जोडणी, भार बदल, वीज चोरीची तक्रार देणे, नावांत बदल करणे, बिल बघून भरणे, मागील बिले डाऊनलोड करणे व अन्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.

संकेतस्थळाला भेट देणे किंवा ॲप डाऊनलोड करण्याखेरीज डिजिटल सेवा उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्यांच्या वीज देयकाचा भरणा करण्यासंबंधी मदत करण्यासाठी, संकेतस्थळ, व्हॉट्सॲप, यूपीआय, पेमेंट, ईएफटी / आयएमपी / आरटीजीएसची सोय उपलब्ध आहे. नेट बँकिंग व ऑनलाईन ऐच्छिक ठेव योजना उपलब्ध आहे. परंतु जे ग्राहक डिजिटल सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत, अशांसाठी, जिनीयस पे भरणा यंत्र आहेत. त्याद्वारे सोप्या पद्धतीने रोख भरणा, धनादेश अथवा कार्डद्वारे देयकाचा भरणा करता येईल.

काही विशिष्ट ठिकाणी फिरते वीज बिल भरणा केंद्रे कार्यरत केली आहेत. ही केंद्रे त्या भागातील वीजबिल भरण्याच्या अखेरचा दिनांक लक्षात घेऊन त्या भागात पाठवली जातात. यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरापासून दूर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळता येईल. मीटर रिडिंग हे वेळापत्रकानुसार केले जात आहे. ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वीज वापरानुसार बिल दिले जाते. पण ग्राहकांना वाटल्यास ते स्वत:हून मीटर रिडिंग सबमिट करू शकतात.