विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या ३ ते ४ महिन्यापासून अतिरीक्त भारनियमन सुरू असून हे भारनियमन तालुक्यातील जनता सहन करीत आहे. परंतु या भारनियमनाव्यतिरिक्त जी वीज ये-जा करते याबाबत महावितरण मौन बाळगून आहे. उलट वीज पाहिजे असेल तर घ्या नाहीतर बंद करा, असाच विचार महावितरणचा असून वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. आधीच १० ते ११ तास लोडशेडींग व त्यातच व्होल्टेजचा दाबही कमी १०० ते १५० व्होल्टेज मिळत असल्याने घरातील उपकरणे चालत नसल्याने महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात ओंदे येथे सबस्टेशन असून या ठिकाणाहून ३२ के.व्ही लाईन आहे व तीन फिडरहून या विजेचा सप्लाय पाठविला जातो. परंतु विजेचा दाब फारच कमी असून या कमी दाबाचा पुरवठा तरी सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हा प्रकार सुरू असून या प्रकाराकडे वीज कंपनीने दुर्लक्ष केले तर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही नागरीकांनी दिला आहे. (वार्ताहर)
महावितरणच्या कारभारावर वीज ग्राहक त्रस्त
By admin | Published: June 23, 2014 2:50 AM