Join us

भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

By सचिन लुंगसे | Published: April 17, 2024 6:38 PM

मुंबई शहर व परिसरात विजेची मागणी ३ हजार ९०० मेगावॉट एवढी होती. बुधवारी दुपारी विजेची मागणी वाढली.

मुंबई : महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात बुधवारी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० केव्ही अति उच्च दाब पडघे - कळवा सर्किट - १ मध्ये भार वाढल्यामुळे ठाणे, कळवा, वाशी, कलरकेम, महापे व टेमघर या परिसरात १६० मेगावॉट विजेचे भारनियमन करावे लागले. महापारेषणची सुरक्षा प्रणाली कार्यान्वित झाल्याने वीजपुरवठा तातडीने पूर्ववत झाला.मुंबई शहर व परिसरात विजेची मागणी ३ हजार ९०० मेगावॉट एवढी होती. बुधवारी दुपारी विजेची मागणी वाढली. विजेवर अति भार वाढल्यामुळे १६० मेगावॉटचे भारनियमन करावे लागले. त्यामुळे कळवा येथील उपकेंद्रात ४०० केव्ही पडघे - कळवा सर्किट - १ मध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम २२० केव्ही वाशीमध्ये होऊन १२ मेगावॉट व २२० केव्ही कलरकेमचा ६० मेगावॉटचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. दुपारी चारच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.  २२० केव्ही महापेचा ३१ मेगावॉटचा वीजपुरवठा ३ वाजून ५५  मिनिटांनी तर २२० केव्ही टेमघरचा ६० मेगावॉटचा वीजपुरवठा सव्वाचारच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला.

टॅग्स :मुंबईवीज