Join us

महाराष्ट्रात सत्ता; महापालिकेत चुरस, शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपामध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 2:27 AM

शिवसेना- राष्ट्रवादी-भाजपामध्ये खडाजंगी

ठळक मुद्देराज्यातील सत्ता नव्हती तोवर मुंबई महापालिकेतील पक्षाच्या कारभारावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बारीक लक्ष होते. मुंबईतील नगरसेवकांच्या विभागवार नियमित बैठका होत असत

मुंबई : राज्यातील सत्तेच्या जोरावर आक्रमक खेळी करत भाजपने मुंबई महापालिकेच्या गत सार्वत्रिक निवडणुकीत स्वतःची शिवसेनेच्या बरोबर आणून ठेवली. आता राज्यातील सत्ता शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी रणसंग्रामातील रसदीचे पारडे शिवसेनेकडे झुकले आहे. याच जोरावर आपले संख्याबळ वाढवत भाजपला पायबंद घालण्याचे मनसुबे सेना नेते आखत होते. मात्र, राज्यातील सत्तेचा फायदा होणार की उलट फटका सोसावा लागणार, अशी धास्ती पालिकेचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी सध्या सतावत आहे.

राज्यातील सत्ता नव्हती तोवर मुंबई महापालिकेतील पक्षाच्या कारभारावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बारीक लक्ष होते. मुंबईतील नगरसेवकांच्या विभागवार नियमित बैठका होत असत. महापौरांसह स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महत्त्वाच्या समित्यांच्या प्रमुखांसोबत आढावा घेतला जाई. यात शिवसेना संघटनेच्या तसेच नगरसेवकांच्या तक्रारी ऎकल्या जात. त्यावर चर्चा, सुनावणी, निर्णय होत असत. महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांमधील संघर्ष एका मर्यादेत राहील, याची दक्षता घेतली जात असत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून त्यांच्यावरील अन्य जबाबदारी वाढली. त्यातच कोरोनाच्या संकटाने सर्वच समीकरणे बदलून टाकली. एकीकडे मुंबईतील स्थिती आटोक्यात आणतानाच राज्यातील अन्य प्रश्नांनाही वेळ देणे अगत्याचे झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेतील राजकारणासाठी पक्षप्रमुखांकडून मिळणारा विशेष वेळ आता दुर्मीळ बाब बनली आहे. राज्यात सत्तास्थापनेनंतर अद्याप एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे आमची गाऱ्हाणी मांडायची कुठे, असा प्रश्न पालिकेच्या राजकारणातील नगरसेवक आणि नेत्यांकडून होत आहे.दुसरीकडे, पालिकेच्या राजकारणात शिवसेना गटातटात विभागली गेली आहे. महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समितीचे यशवंत जाधव यांच्यातील संघर्ष नवे नाहीत. कोरोनाच्या काळातील विविध कामात जाधव यांना संधी मिळाली नाही. तर, घरात आमदारकी आणि आता स्थायीची दुसरी टर्मसुद्धा जाधवांनाच देण्यात आली. त्यामुळे आम्हाला काही मिळणार की निवडक लोकांकडेच सत्तापदे राहणार, अशी भावना महत्त्वाकांक्षी नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शिवाय या सर्व कुरबुरी, गाऱ्हाणी मांडायची तरी कुणाकडे या प्रश्न अनुत्तरित आहे. अंतिम निर्णय मातोश्रीतून होतो. पण, आता मातोश्रीच्या वेळांना मर्यादा पडल्या आहेत. तर, दुसरीकडे अन्य कोणत्याच नेत्याकडे निर्विवादपणे मुंबईची जबाबदारी नाही. त्यामुळे एकप्रकारची निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.

शिवसेनेतील बड्या नेत्यालाही आपली कामे रेटण्यासाठी राष्ट्रवादीशी सूत जुळवावे लागल्याची चर्चा आहे. भाजपच्या आव्हानासोबतच मित्रपक्षही एका मर्यादेबाहेर वाढणार नाहीत, याची काळजी शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. ही सर्व आव्हाने दिसत असली, माहित असली तरी त्या सोडविण्यासाठी आवश्यक वेळ पक्ष नेतृत्वाला सध्यातरी देता येत नसल्याचे वास्तव आहे.

राष्टवादीही झाली आक्रमकमुंबईत स्वतःचे स्थान वाढवू पाहणाऱ्या राष्ट्रवादीने आक्रमकपणे पालिकेच्या राजकारणातील सूत्रे हलवायला सुरू केली आहेत. राष्ट्रवादीशी संबंधित लोकांची कामे पटापट मार्गी लागत आहेत. दोन दशकांहून अधिक काळ पालिकेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेतील बड्या नेत्यालाही आपली कामे रेटण्यासाठी राष्ट्रवादीशी सूत जुळवावे लागल्याची  चर्चा आहे.

एकाचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे आव्हान पक्षीय राजकारणाच्या बाहेर एकाचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. भाजपने उघडपणे शिवसेनेसमोर शड्डू ठोकला आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नव्या मित्रांच्या वेगळ्याच कथा आहेत. कायम कोणत्यातरी द्वंद्वात राहणारी काँग्रेस सध्या स्वबळ की महाविकास आघाडी या चर्चेत असल्याने या आघाडीवर शिवसेनेला स्वस्थता आहे. मात्र, 

 

टॅग्स :निवडणूकमुंबई महानगरपालिकाभाजपा