परळ भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 04:00 PM2020-09-13T16:00:14+5:302020-09-13T16:00:48+5:30
१० दिवसात करणार विद्युत दाहिनीची अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती
सदर कालावधी दरम्यान पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा असणार कार्यरत
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणा-या भोईवाडा स्मशानभूमीतील 'विद्युत दाहिनी' ही देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक १४ ते २३ सप्टेंबर २०२० या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.
या १० दिवसांच्या कालावधी दरम्यान प्रामुख्याने मोडकळीस आलेल्या विद्युत दाहिनीची चिमणी बदलण्याच्या कामासह इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहे. तथापि, या कालावधीदरम्यान पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा सुरू राहणार आहे.
तसेच वरील कालावधीदरम्यान विद्युत दाहिनी आधारित सेवा ही नजीकच्या शिवाजी पार्क, शीव आणि रे रोड येथील स्मशानभूमीत सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.