वीजदर कमी होतील: लोकेश चंद्र; महावितरणचा १८ वा वर्धापन दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:51 PM2023-06-07T12:51:17+5:302023-06-07T12:51:31+5:30

महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लोकेश चंद्र बोलत होते.

power rates to come down says lokesh chandra celebrating the 18th anniversary of mahavitaran | वीजदर कमी होतील: लोकेश चंद्र; महावितरणचा १८ वा वर्धापन दिन साजरा

वीजदर कमी होतील: लोकेश चंद्र; महावितरणचा १८ वा वर्धापन दिन साजरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : केंद्राच्या मदतीने राज्यात आरडीएसएस योजना राबवण्यात येत असून, ही योजना यशस्वी होण्याकरिता चांगल्याप्रकारे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होईल. क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार असल्याने उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना स्पर्धात्मक दराने वीज मिळण्यास मदत होईल. तसेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवायचा असून, यामुळे वीजदर कमी होणे अपेक्षित असल्याचे महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी सांगितले.

महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लोकेश चंद्र बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालनचे संचालक संजय ताकसांडे, वित्तचे संचालक अनुदीप दिघे, प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे, वाणिज्य संचालक योगेश गडकरी व मानव संसाधनचे संचालक अरविंद भादिकर उपस्थित होते.

विश्वास पाठक म्हणाले, राज्यात औद्योगिक व आर्थिक प्रगती साधायची असेल तर वीज ही अत्यावश्यक घटक आहे. त्याकरिता विजेचे नियोजन आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वीज यंत्रणेचे सक्षमीकरण झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलीयनवर नेण्यास महाराष्ट्र तयार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली निमजे  यांनी केले तर आभार कंपनी सचिव अंजली गुडेकर यांनी मानले. वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता मनाची अमर्याद शक्ती या विषयावर डॉ.दत्ता कोहिनकर यांनी कार्यशाळा घेतली. तर सायंकाळी स्वरस्पर्श हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.

दर्जेदार सेवेसाठी महावितरण प्रयत्नशील

लोकेश चंद्र म्हणाले, ऊर्जा ही सर्व प्रगती साध्य करण्याची मूलभूत गरज आहे. सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरिता आवश्यक तेवढी ऊर्जा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याद्दष्टीने महावितरण सध्या चांगले काम करत आहे. गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी  व कर्मचारी सातत्याने परिश्रम करत आहेत.

ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून स्मार्ट मीटर, स्काडा असे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवायचे आहेत. यापुढेही आपण ग्राहक सेवेच्या गुणवत्तेत सातत्य राखाल. येणाऱ्या काळात महावितरणची  आणि पर्यायाने राज्याची प्रगती अधिक जोमाने होईल.

 

Web Title: power rates to come down says lokesh chandra celebrating the 18th anniversary of mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.