आजपासून राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताह! संयमित वीज वापराबद्दल मार्गदर्शन केले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:18 AM2018-01-11T06:18:43+5:302018-01-11T06:19:00+5:30
शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागाने राज्यात गुरूवारी, ११ ते १७ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुंबई : शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागाने राज्यात गुरूवारी, ११ ते १७ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्युत निरीक्षक, महावितरण, खासगी वीज निर्मिती कंपन्या यांच्या कार्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जाईल. विद्युत कंत्राटदार संघटना आणि वीज साहित्याचे उत्पादन करणाºया कंपन्यांच्या सहकार्याने विद्युत सुरक्षा सप्ताह राबविला जाईल. या सप्ताहादरम्यान सुरक्षित वीज वापरासोबतच संयमित वीज वापराबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्युत निरीक्षणालयाचा ऊर्जा विभागात समावेश झाल्यामुळे गत दोन वर्षांपासून विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित होत आहे. विजेचा वापर करताना काय खबरदारी द्यावी?, याबाबत सप्ताहात मार्गदर्शन केले जाते. यामुळे वीज अपघाताबाबत बºयापैकी नियंत्रण आणण्यात यश प्राप्त झाले आहे.
काही शाळांमध्ये विद्युत सुरक्षादूत म्हणून काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी फावल्या वेळेत अन्य विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व सांगून सुरक्षित वीज वापराबद्दल मार्गदर्शन करु शकतील. या कार्यक्रमाला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत यांची उपस्थिती असेल.