मेट्रो कामामुळे वीजपुरवठा होणार खंडित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:20 AM2019-11-22T01:20:10+5:302019-11-22T01:20:18+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-२ अ मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवला आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-२ अ मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवला आहे. दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ मार्गावर कामराजनगर येथे मोनोपोल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे दहिसर पश्चिम आणि अंधेरी पश्चिम दरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे काम शनिवार २३ आणि रविवार २४ नोव्हेंबरच्या रात्री १२.०० ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. या कामामुळे कांदिवली आणि अंधेरी पश्चिम दरम्यानच्या भागात वीजपुरवठा होणार नसल्याने उपनगरातील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी पर्यायी यंत्रणा वापरून खंडरहित विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची शाश्वती दिलेली आहे.