Join us

पॉवरलूमला उभारी देण्यासाठी ‘पॉवर टॅक्स’ योजना

By admin | Published: June 16, 2017 1:39 AM

भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी येथील पॉवरलूम व्यवसायाला उभारी देण्यासाठी पॉवर टॅक्स योजना पुढे आणली आहे. त्याचा फायदा आता छोट्या-मोठ्या पॉवरलूम

- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी येथील पॉवरलूम व्यवसायाला उभारी देण्यासाठी पॉवर टॅक्स योजना पुढे आणली आहे. त्याचा फायदा आता छोट्या-मोठ्या पॉवरलूम उद्योजकांना होत आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी सांगितले. या योजनेचे पॉवरलूम उद्योजकांनी स्वागतही केले असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपाप्रणीत केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने मागील तीन वर्षांत कोणकोणत्या योजना आणल्या आणि त्या कशा यशस्वी केल्या, याची माहिती पत्रकारांना देण्यासाठी तसेच यानिमित्ताने आयोजित मेळाव्यासाठी इराणी गुरुवारी ठाण्यात आल्या होत्या. या वेळी इराणी म्हणाल्या की, यापूर्वी कापड उद्योग ३५ टक्के कर भरत होता. परंतु, जीएसटी लागू झाल्यावर तो ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्याचा फायदा कापड उद्योग व्यावसायिक आणि ग्राहकांना होईल. छोट्या पॉवरलूम उद्योजकांनी एकत्र येऊन संघटना केल्यास त्यांच्यासाठी यंत्रसामग्री खरेदीसाठी दोन कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी बोलताना केले. पॉवरलूम व्यवसाय उद्योगांना ऊर्जा पुरवण्यासाठी सोलर पॉवरचा वापर करणाऱ्यांना आता ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.भाष्य टाळलेसॅनिटरी नॅपकिनवर लावलेल्या जीएसटीबाबत इराणी यांना विचारले असता, आपण जीएसटी कौन्सिलच्या सदस्य नसल्याने त्यावर काहीही बोलू शकत नाही. याबाबत जीएसटी कौन्सिलच्या सदस्यांनी यापूर्वीच भाष्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.