Join us

कोविड रुग्णालयांना मागेल तेव्हा वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:02 AM

महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्जलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा ...

महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार तत्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. महिन्याभरात राज्यातील १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ३५ कोविड रुग्णालयांना तत्काळ नवीन वीजजोडणी दिली आहे.

ज्या कामांना इतरवेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे. महिन्याभरात १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली. एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित केला.

के. नायट्रोक्सिजन (सातारा), सोना अलॉयज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनींना मदत करण्यात आली आहे.

* ३५ कोविड रुग्णालयांना ४८ तासांत नवीन जोडणी

- ३५ कोविड रुग्णालयांना ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ११, अहमदनगर ६, पुणे व नंदुरबार जिल्हा प्रत्येकी ४, नाशिक, ठाणे व नागपूर प्रत्येकी २, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण ३५ कोविड रुग्णालयांना ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

-के. चंद्रा इंजिनिअरिंग वर्क्स (जेजुरी, जि. पुणे), ऑक्सिएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या २० मेट्रिक टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्रकल्पांना ४८ तासांमध्ये ५२३ केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.

- जेएसडब्ल्यू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात १०९ एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे.

--------------------