चार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसे संपताच बत्ती होणार गुल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 02:33 PM2023-12-31T14:33:00+5:302023-12-31T14:33:17+5:30

वीज ग्राहक संघटना आणि राजकीय पक्षाकडून स्मार्ट मीटरला विरोध

Power will be available only after charging; As soon as the money runs out, the light will turn on! | चार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसे संपताच बत्ती होणार गुल!

चार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसे संपताच बत्ती होणार गुल!

मुंबई : वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी सुरू झाली आहे. थकबाकीला आवर घालण्यासाठी वीज कंपन्या आता स्मार्ट मीटर घेऊन येत आहे. त्यामुळे रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे. 

मोबाइलप्रमाणे पैसे संपले की लाइट जाणार आहे. स्मार्ट मीटरचे असंख्य फायदे असलयाचा दावा वीज कंपन्या करत असल्या तरी दुसरीकडे वीज ग्राहक संघटना आणि राजकीय पक्षाकडून  स्मार्ट मीटरला काही कारणांनी विरोधही दर्शविला जात आहे. टाटा पॉवरने १,२५,००० पेक्षा जास्त ग्राहकांकडे स्मार्ट मीटर्स बसवले आहेत. २०२५ पर्यंत ७,५०,००० ग्राहकांना स्मार्ट मीटर्स दिले जातील. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईने पहिल्या टप्प्यात नियोजित केलेल्या ७ लाख स्मार्ट मीटरपैकी बहुतांश स्मार्ट मीटर यापूर्वीच लावले आहेत.

अदानी एनर्जी सोल्युशन्सकडे बेस्ट (मुंबई - १०.८ लाख), महावितरण (उर्वरित महाराष्ट्र - १.१५ कोटी) यासारख्या वीज वितरकांकडून २ कोटी स्मार्ट मीटरकरिता मागणी नोंदविली गेली आहे. यात लवकरच आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- अदानी इलेक्ट्रिसिटी

स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. पण, ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हेसुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घर बसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंटचीही सुविधा आहे.    - महावितरण

वीज ग्राहक मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील

स्मार्ट मीटर इन-बिल्ट मॉडेम वापरून काम करतात. जे मीटरला सेंट्रल ग्रिडशी जोडतात. हे मीटर्स पोर्टलवर दर तासाला माहिती देतात. जिथे ग्राहक आपली माहिती ॲक्सेस करू शकतात. ग्राहकांना त्यांच्या वापराबद्दल आणि बिलिंगबद्दल एसएमएस अलर्ट देखील हे स्मार्ट मीटर पाठवतात. फर्मवेअर अपडेट्स किंवा रिकनेक्शन-डिस्कनेक्शन सारखे आदेश केंद्रीय ग्रिडकडून प्राप्त करण्यास हे मीटर्स सक्षम आहेत.    - टाटा पॉवर

Web Title: Power will be available only after charging; As soon as the money runs out, the light will turn on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.