घोटाळेबाज ठेकेदारांना सत्ताधाऱ्यांचे अभय

By admin | Published: May 5, 2016 02:01 AM2016-05-05T02:01:21+5:302016-05-05T02:01:21+5:30

रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळेबाज ठरलेल्या ठेकेदारांनाच पुन्हा पूल बांधण्याचे कंत्राट आज देण्यात आले़ सत्ताधारी शिवसेना भाजपा युतीने या ठेकेदारांवर मेहेरनजर दाखवित बहुमताच्या

Powerful Unlawful to Contractors | घोटाळेबाज ठेकेदारांना सत्ताधाऱ्यांचे अभय

घोटाळेबाज ठेकेदारांना सत्ताधाऱ्यांचे अभय

Next

मुंबई : रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळेबाज ठरलेल्या ठेकेदारांनाच पुन्हा पूल बांधण्याचे कंत्राट आज देण्यात आले़ सत्ताधारी शिवसेना भाजपा युतीने या ठेकेदारांवर मेहेरनजर दाखवित बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर केला़ यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग करीत युतीचा निषेध केला़
रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ३८ ते १०० टक्के अनियमितता आढळून आली आहे़ याप्रकरणी सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, त्यांची नोंदणी रद्द करुन त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु झाली़ एकीकडे या ठेकेदारांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु असताना त्यांना सुमारे दोनशे कोटी रुपयांचे पुलांचे कंत्राट देण्याची शिफारस प्रशासनाने केली़
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज मंजुरीसाठी मांडण्यात आला़ या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाने कडाडून विरोध केला़ मनसेच्या सदस्याने प्रस्तावाची प्रत फाडून सभात्याग केला़ मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षासह स्वपक्षीय सदस्यांचाही विरोध डावलून हा प्रस्ताव मंजूर केला़ (प्रतिनिधी)

दोषी ठेकेदारांना कारणे दाखवा
रस्ते कामांमध्ये घोटाळेबाज ठरलेल्या दोषी ठेकेदारांना येत्या चार दिवसांमध्ये कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले़

प्रशासनाने उचलली जबाबदारी
रस्ते कामांमध्ये घोटाळेबाज ठरलेल्या ठेकेदारांना पूल बांधण्याचे कंत्राट देण्याची शिफारस होतेच कशी, असा जाब विरोधी पक्षांनी विचारला़ मात्र पूल बांधण्याच्या कामाची जबाबदारी प्रशासन घेत असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली़

पूल व त्याचे काम मिळालेले ठेकेदार
लोखंडवाला बॅक रोड
जंक्शन, अंधेरी
ठेकेदार जे़ कुमार इन्फ्राप्रोजेक्ट़
पालिकेचे अंदाजपत्रक ३३ कोटी ७१ लाख रुपये
ठेकेदाराला देय रक्कम ६० कोटी ७४ लाख रुपये
सॅण्डहर्स्ट रोड, हँकॉक पुलाचे बांधकाम
ठेकेदार जेक़ुमार इन्फ्राप्रोजेक्ट
अंदाजपत्रक २७ कोटी ३६ लाख रुपये
ठेकेदाराची बोली ५५ कोटी १४ लाख रुपये
विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल
ठेकेदार आऱपी़एस इन्फ्राप्रोजेक्ट
अंदाजपत्रक ३० कोटी ४० लाख रुपये
देय रक्कम ५५ कोटी २४ लाख रुपये़
मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण
ठेकेदार आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट
अंदाजपत्रक ३० कोटी
५६ कोटी रुपये ठेकेदाराला देणार

Web Title: Powerful Unlawful to Contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.