रखडलेल्या जुन्या प्रकल्पांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे मिशन २०१९

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 05:29 AM2019-01-01T05:29:01+5:302019-01-01T05:29:24+5:30

कोस्टल रोड, राणीबागेचे नूतनीकरण आणि जोगेश्वरी-मुलुंड जोड रस्ता, वस्त्रोद्योग संग्रहालय या प्रकल्पांना २०१९ मध्ये वेग मिळणार आहे.

 Powermakers' mission to fulfill the resolved old projects of 2019 | रखडलेल्या जुन्या प्रकल्पांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे मिशन २०१९

रखडलेल्या जुन्या प्रकल्पांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे मिशन २०१९

Next

मुंबई : नवीन प्रकल्पांची घोषणा टाळत हातात असलेल्या प्रकल्पांवरचे महापालिकेने वर्षभर भर दिला. मात्र, अनेक घोषणा आजही कागदावरच असल्याने निवडणुकीच्या वर्षात त्याचा श्रीगणेशा करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने जोर लावला आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड, राणीबागेचे नूतनीकरण आणि जोगेश्वरी-मुलुंड जोड रस्ता, वस्त्रोद्योग संग्रहालय या प्रकल्पांना २०१९ मध्ये वेग मिळणार आहे.
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या जकात कराच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांना आर्थिक पाठबळ मिळत होते. मात्र, जकात कर रद्द झाल्याचा फटका पालिकेच्या पायाभूत प्रकल्पांना बसला. त्यामुळे जुन्याच प्रकल्पांना पूर्ण करण्याचा संकल्प महापालिकेने केला, परंतु महापालिकेचे असे अनेक मोठ्या प्रकल्पांचा अद्याप श्रीगणेशाही झालेला नाही. या प्रकल्पांना पुढील वर्षभरात वेग मिळवून देण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.

असे आहेत प्रकल्प
दोन नवे क्रीडा संकुल : बोरीवलीतील १२ एकर तर अंधेरीतील वि. रा. देसाई मार्गावर सुमारे ११ एकरावर बांधण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाचे द्वार नवीन वर्षात खुले होणार आहे.
२२ उद्याने : स्काय वॉक, मेट्रो पूल व रस्त्यावरील उड्डाणपूल यासारख्या विविध प्रकारच्या पुलांखाली असणाºया तीन लाख, १४ हजार, ३२६ चौरस फूट जागेत २२ उद्याने विकसित होणार आहेत.

फ्लोरा फाउंटन : मुंबईची ऐतिहासिक ओळख असलेल्या हुतात्मा चौकात फ्लोरा फाउंटन हे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधलेले ऐतिहासिक कारंजे आहे. हे कारंजे संध्याकाळच्या मुंबईची शोभा वाढविण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे.

राणीबाग फुलणार : प्राणी व पक्ष्यांसाठी नवीन १७ अद्ययावत पिंजरे बसविण्यात येणार आहेत. यापैकी प्राण्यांसाठी १५ तर पक्ष्यांसाठी दोेन पिंजरे असणार आहेत. या पिंजºयामध्ये वाघ, सिंह, बारशिंगा, काळविट, लांडगा, कोल्हा, नीलगाय आदी प्राणी नवीन वर्षात मुंबईकरांना बघायला मिळणार आहेत.
वस्त्रोद्योग संग्रहालय : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाºया या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास अखेर लवकरच सुरुवात होणार आहे.
रोबोद्वारे नालेसफाई : शहर भागातील सुमारे ७० कि.मी. लांबीच्या भूमिगत वाहिन्यांच्या आत जाऊन साफसफाई करण्यासाठी मिनी रोबो हे यंत्र उपयोगात आणले जाणार आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यास मदत होईल.
माहिती तंत्रज्ञान : नागरीसेवा - सुविधा नवीन वर्षात ९८ टक्के आॅनलाइन पद्धतीने झालेली असेल.

३९ किमीचा सायकल ट्रॅक : मुंबईतील अंतर्गत वाहतुकीला नवा पर्याय देणाºया ३९ किमी लांबीच्या सायकल ट्रॅकच्या चारपैकी पहिल्या दोन टप्प्यांचे बांधकाम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे सायकलने मुलुंडहून धारावीला किंवा घाटकोपरहून शीव असा प्रवास करता येईल.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता : पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा व तीन टप्प्यात राबविला जाणारा प्रस्तावित गोरेगाव मुलुंड लिंक रोड या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. तर या प्रकल्पाच्या दुसºया व तिसºया टप्प्यांसाठीची प्राथमिक कार्यवाही पुढच्या वर्षी होईल.

Web Title:  Powermakers' mission to fulfill the resolved old projects of 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई