विरार महापालिकेच्या भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:51 AM2018-02-12T02:51:21+5:302018-02-12T03:05:50+5:30

राज्यातील जनतेला चांगली आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळावी, यासाठी ३०० खाटांची सरकारी रुग्णालये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलनुसार चालवण्याचा सरकारचा विचार आहे.

 PPP model for government hospitals, government appointed committee; Report in three months | विरार महापालिकेच्या भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

विरार महापालिकेच्या भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

googlenewsNext

ठाणे : विरार महापालिकेच्या भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी मानपाड्याजवळ घडली. पोलिसांनी याप्रकरणी बसचालकास अटक केली आहे.
ठाण्यातील मानपाडा पुलाजवळ शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. वसई-विरार महापालिकेच्या भरधाव बसने एका दुचाकीस्वार युवकास मागच्या चाकाखाली चिरडले. या अपघातात त्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. युवकाजवळ आढळलेल्या कागदपत्रांवरून त्याचे नाव रवी चंद्रा (३०) असल्याचे स्पष्ट झाले. मृत युवक मूळचा तेंलगणा येथील असून, दोन-तीन महिन्यांपूर्वीच तो नोकरीसाठी ठाण्यात आला होता, अशी माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी
सुधीर कदम यांनी दिली. अपघातानंतर बसचालक सुभाष चव्हाण स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.

Web Title:  PPP model for government hospitals, government appointed committee; Report in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात