प्रभादेवी स्थानकाचे फलक लागले, नामांतरणाच्या श्रेयावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 05:00 AM2018-07-19T05:00:09+5:302018-07-19T05:00:24+5:30
एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात आले. त्यानुसार स्थानकात फलकही लागले. तथापि नामांतरणाच्या श्रेयावरून शिवसेनेतील मंत्री, खासदारांमध्ये वाद झाले. त्यामुळे शिवसेतेनीत धुसफूस चव्हाट्यावर आली.
मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात आले. त्यानुसार स्थानकात फलकही लागले. तथापि नामांतरणाच्या श्रेयावरून शिवसेनेतील मंत्री, खासदारांमध्ये वाद झाले. त्यामुळे शिवसेतेनीत धुसफूस चव्हाट्यावर आली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या म्हणण्यानुसार, ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ असे करण्याबाबत आपण १९९१पासून प्रयत्न करीत होतो. अखेर साधारण
२७ वर्षांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, ५ मे २०१५ रोजी संसदेच्या शून्य प्रहारात नामांतरणाची मागणी सर्वप्रथम आपण केली होती. सद्य:स्थितीत रावते यांच्याकडे राज्यातील महत्त्वाचे असे परिवहन खाते आहे. तर राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद हा नामांतरणाच्या श्रेयावरून सार्वजनिक झाल्यामुळे सामान्य मतदारांमध्ये संभ्रम होता. तर विरोधकांनी वादाची मजा घेतली.