Join us  

प्रभात पुरस्कार-लोकमत सी नेमातर्फे चित्रपट निर्मात्यांसाठी कार्यशाळा

By admin | Published: April 16, 2015 1:08 AM

मराठी चित्रपटनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रभात पुरस्कार आणि लोकमत सी नेमा यांच्या वतीने चित्रपट निर्मात्यांसाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : मराठी चित्रपटनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रभात पुरस्कार आणि लोकमत सी नेमा यांच्या वतीने चित्रपट निर्मात्यांसाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटाच्या वितरण आणि जाहिरातीपासून सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामध्ये मिळणार आहे. ‘प्रभात पुरस्कार’चे विवेक दामले यांनी प्रभात पुरस्कार संवादात सांगितले, ‘‘मराठीतील दर्जेदार चित्रपटनिर्मितीला बळ देण्यासाठी प्रभात पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून दिले जातात. लोकमत सी नेमा या लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचाही हेतू मराठी चित्रपटांचे पाऊल आणखी पुढे पडण्यासाठी त्याला लोकाश्रय मिळवून देणे हाच आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेइतकीच वितरण आणि जाहिरातही आता महत्त्वाचा भाग झाला आहे. कार्यशाळेत चित्रपटाच्या जाहिरात व मार्केटिंग संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता महत्त्वाच्या संस्था असलेल्या यूएफओ आणि स्क्रॅबलच्या या प्रतिनिधींशी थेट संवाद साधता येईल. यामध्ये चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता कशी करावी लागते, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज व इतर खर्च याविषयी खुलासेवार माहिती सांगितली जाईल. शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत लॉ कॉलेज रस्त्यावरील व्ही. जी. दामले हॉल येथे ही कार्यशाळा होणार आहे. यासाठी २५० रुपये नोंदणी शुल्क आहे. नावनोंदणीसाठी निर्मात्याचे नाव, पत्ता, निर्मिती संस्था, पूर्वी केलेल्या अथवा आगामी चित्रपटांचे नाव व संपर्कासाठी ीें्र’ ्र िआणि दूरध्वनी क्रमांक अशी संपूर्ण माहिती स्र१ुंँं३स्र४१ं२‘ं१@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. नावनोंदणीसाठी ८००७७५५९३२ या क्रमांकावर संपर्क साधवा. (प्रतिनिधी)४चित्रपट प्रदर्शनासाठी विविध चित्रपटगृहांची निवड व त्याकरिता आवश्यक त्या जाहिरात माध्यमांची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. चित्रपटाच्या जाहिरातींमध्ये पारंपरिक साधनांसोबतच आता सोशल मीडियाचाही (फेसबुक, ट्विटर) प्रभावी वापर होत आहे, याबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे. वृत्तपत्रे, मॅगझिन्ससाठी बजेट कसे असावे, याविषयी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटनिर्मितीसाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाबाबत विस्तृत माहिती मिळणार आहे. ४चित्रपट निर्मात्याचा कमीत कमी खर्चामध्ये आणि योग्य त्या पद्धतीने चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे. निर्मात्यांचा अनावश्यक खर्च टाळून कोणतीही दिशाभूल न होता जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने चित्रपट प्रदर्शन करण्याविषयी स्वत: निर्मात्याला किमान माहिती असावी, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.