खुल्या नाट्यगृहांमध्ये रंगले प्रभात रागांचे सूर; रसिकांची मिळाली दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:26 AM2019-01-20T00:26:56+5:302019-01-20T00:26:59+5:30

शास्त्रीय संगीतातील प्रभात रागांचे सूर, सितार-सरोद-बासरी-संतूर-संवादिनी या वाद्यांचे स्वर आणि तालवाद्यांच्या साथीने शनिवारची सकाळ मुंबईकरांसाठी आगळीवेगळी ठरली.

Prabit chanted melody in the open theaters; Received rascals | खुल्या नाट्यगृहांमध्ये रंगले प्रभात रागांचे सूर; रसिकांची मिळाली दाद

खुल्या नाट्यगृहांमध्ये रंगले प्रभात रागांचे सूर; रसिकांची मिळाली दाद

Next

मुंबई : शास्त्रीय संगीतातील प्रभात रागांचे सूर, सितार-सरोद-बासरी-संतूर-संवादिनी या वाद्यांचे स्वर आणि तालवाद्यांच्या साथीने शनिवारची सकाळ मुंबईकरांसाठी आगळीवेगळी ठरली. निमित्त होते ते महापालिकेच्या उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभांचे.
महापालिकेच्या २९ उद्यानांमध्ये असणाऱ्या खुल्या नाट्यगृहांपैकी काही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभांना मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापालिकेच्या उद्यान खात्याच्या पुढाकाराने आणि बनयान ट्री व टेंडर रूट्स अकॅडमी या संस्थांच्या सहकार्याने शनिवारी सकाळी ७ ते ९ दरम्यान आयोजित संगीत सभांमध्ये ७५पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे विविध पैलू उलगडून दाखवित, कला सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमांना अधिकाधिक पसंती मिळेल व कलाकारांनाही त्यांची कला सादर करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल़
>संगीत सभांबाबत मुंबईकरांनी अतिशय उत्साहवर्धक प्रतिक्रिया नोंदविण्यासह यापुढेही असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशा सूचनाही महापालिकेच्या उद्यान खात्याकडे केल्या आहेत.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका
>१७ उद्यानांची नावे
टाटा उद्यान, ब्रिचकँडी रुग्णालयाजवळ, भुलाभाई देसाई मार्ग, जोसेफ बाप्टिस्टा उद्यान, माझगाव, आदि शंकराचार्य उद्यान, पोलीस कॉलनी, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, बाळासाहेब केशव ठाकरे मनोरंजन मैदान, प्रकाश कॉटन मिलजवळ, लोअर परळ, बाजी प्रभू उद्यान, शिवाजी पार्कजवळ, दादर (प.), वांद्रे किल्ल्याजवळील उद्यान, जॉगर्स पार्क, कार्टर रोड, वांद्रे (प.), रावसाहेब पटवर्धन उद्यान, लिकिंग रोड, वांद्रे (प.), लायन्स जुहू मुलांचे पालिका उद्यान, सांताक्रुझ (प.), वीर सावरकर मनोरंजन मैदान, मालाड (प.), मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम, जोगेश्वरी (पू.), किशोर कुमार बाग, म्हाडा कॉलनी, अंधेरी (प.), स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, बोरीवली (प.), ड्रीम पार्कजवळील उद्यान, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू.), मारुती मंदिर मैदान, मारुती नगर, दहिसर (प.), सी. डी. देशमुख उद्यान, मुलुंड, कमला नेहरूउद्यान, मलबार हिल

Web Title: Prabit chanted melody in the open theaters; Received rascals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.