Join us

प्रदीप जैन खटल्यातही रियाझ दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 4:47 AM

विकासक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने रियाज सिद्दीकी याला गुरुवारी दोषी ठरवले. रियाज सिद्दीकी याला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही दोषी ठरविण्यात आले आहे

मुंबई: विकासक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने रियाज सिद्दीकी याला गुरुवारी दोषी ठरवले. रियाज सिद्दीकी याला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही दोषी ठरविण्यात आले आहे. प्रदीप जैन हत्येप्रकरणी त्याला पुढील महिन्यात शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. तर १९९३ बॉम्बस्फोटाप्रकरणी त्याला ७ सप्टेंबर रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.‘१९९५ च्या प्रदीप जैन हत्येप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने रियाज सिद्दीकीला दोषी ठरवले आहे. पुढील महिन्यात त्याला शिक्षा ठोठावण्यात येईल,’ असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. याच केसमध्ये २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने पोर्तूगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमला व त्याच्या ड्रायव्हरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.सिद्दीकीला २००६ मध्ये ‘माफीचा साक्षीदार’ म्हणून न्यायालयाने जाहीर केले. मात्र २००८ मध्ये त्याने या हत्येसंबंधी संपूर्ण माहिती देण्यास नकार दिल्याने सरकारी वकिलांनी त्याला ‘फितूर’ झाल्याचे जाहीर केले.

टॅग्स :न्यायालय