Join us

प्रदीप शर्माची एनआयएकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

वाझे, मानेसमोर होणार चौकशी; स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार ...

वाझे, मानेसमोर होणार चौकशी; स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार व ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. गुन्ह्यातील त्याचा सहभाग स्पष्ट झाला असून, या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे व सुनील माने या खात्यातील बडतर्फ अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे त्याच्यासमोर बसवूनही त्याच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचेही एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

एनआयएने गुरुवारी मोठी कारवाई करताना प्रदीप शर्मा याच्यासह तिघांना अटक केली. हिरेनची हत्या करण्याचा कट त्याने वाझेसमवेत केला होता. त्याचबरोबर संतोष शेलार, आशिष जाधव, सतीश मोठकरू व मनीष सोनी यांना हिरेनला मारण्याची सुपारी दिल्याचे त्याच्या जबाबैतून स्पष्ट झाले आहे. या तिघांना २८ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून गुन्ह्याचा हेतू जाणून घेण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शर्मा हा या प्रकरणातला मास्टरमाईंड नसला तरी त्याची भूमिका महत्त्वाची होती, त्यामुळे यामागील मास्टरमाईंडपर्यंत पोहचण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे तपास यंत्रणा शनिवारपासून त्याच्याकडे त्याबाबत कसून विचारणा करत आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझे व सुनील माने यांना त्याच्या समोरासमोर बसवून विचारणा केली जाणार असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.