प्रफुल्ल पटेल यांची साडेअकरा तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:08 AM2019-10-19T06:08:08+5:302019-10-19T06:08:30+5:30

इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण

Praful Patel interrogated for 11 and a half hours | प्रफुल्ल पटेल यांची साडेअकरा तास चौकशी

प्रफुल्ल पटेल यांची साडेअकरा तास चौकशी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी कसून चौकशी केली. मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमन याच्याशी मालमत्ता खरेदी प्रकरणी पटेल यांचा संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्याकडे जवळपास साडेअकरा तास चौकशी सुरू होती. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ईडी कार्यालयात गेलेले पटेल रात्री साडेदहा वाजता तेथून बाहेर पडले. आता त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा पाचारण करण्यात येऊ शकते.
बॅलार्ड पिअर परिसरातील ईडीच्या कार्यालयात पटेल सकाळी हजर झाले. त्यानंतर त्यांच्याकडे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वरळीतील सीजे हाउसच्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली. ही चौकशी रात्री साडेदहापर्यंत सुरू होती. अधिकाऱ्यांनी पटेल यांना मिलेनियम डेव्हलपर्सच्या माध्यमातून मिर्ची, त्याची पत्नी मेहरा हिच्याशी व्यवहार केला आहे का, त्याच्याशी भेट घेतली होती का, पुनर्विकासामध्ये कोण कोण भागीदार होते आदींबाबत सविस्तर माहिती घेतली.
या प्रकरणी आठवड्यापूर्वी अटक केलेल्या रणजीत सिंग बिंद्रा व हरुन युसूफ या दलालांच्या चौकशीतून पटेल यांचे नाव पुढे आले. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाºया इक्बाल मिर्चीचे फरार असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसूफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने रणजीत सिंग बिंद्रा व हरुन युसूफ यांनी दलाली केली होती.
ईडीच्या अधिकाºयांनी पटेल यांची विनंती नाकारली
प्रफुल्ल पटेल यांनी ईडीचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच कार्यालयात हजेरी लावली होती. सकाळी अकराच्या सुमारास अधिकारी आल्यानंतर त्यांनी आपल्याला निवडणूक प्रचारासाठी जायचे आहे, त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर चौकशीसाठी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केली. मात्र, अधिकाºयांनी ती फेटाळून लावली. या चौकशीचे राजकीय पडसाद उमटू नयेत, याबाबत पुरेशी खबरदारी घेतली होती. पटेल एकटेच आले होते.

Web Title: Praful Patel interrogated for 11 and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.