Join us

प्रफुल पटेलना ईडीचे समन्स; 6 जूनला हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 4:09 AM

आपण ईडीला पूर्ण सहकार्य करू, असे पटेल यांनी मुंबईत सांगितले.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना एअर इंडियातील घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले आहे. तसे समन्स ईडीने काढले आहे. पटेल यांना ६ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आपण ईडीला पूर्ण सहकार्य करू, असे पटेल यांनी मुंबईत सांगितले. या घोटाळ्यातील एक आरोपी दीपक तलवार सध्या कारागृहात आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रफुल पटेल नागरी वाहतूकमंत्री होते. तेव्हा हा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येते. हे मनी लाँडरिंगचे प्रकरण असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालय