पाटकर महाविद्यालयात रंगला ‘प्रग्योत्सव’ महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 04:04 AM2018-12-23T04:04:27+5:302018-12-23T04:05:04+5:30

चिकित्सक समूह एस. एस. अ‍ॅण्ड एल. एस. पाटकर आणि व्ही. पी. वर्दे कॉलेज (गोरेगाव) महाविद्यालयाच्या बी. ए. एफ. व बी. बी. आय. विभागातील मुलांनी आयोजित केलेला ‘प्रग्योत्सव’ म्हणजे कॉलेज विश्वातील बहुचर्चित महोत्सव. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष आहे.

 'Pragatotsav' festival celebrated at Patkar College | पाटकर महाविद्यालयात रंगला ‘प्रग्योत्सव’ महोत्सव

पाटकर महाविद्यालयात रंगला ‘प्रग्योत्सव’ महोत्सव

Next

मुंबई : चिकित्सक समूह एस. एस. अ‍ॅण्ड एल. एस. पाटकर आणि व्ही. पी. वर्दे कॉलेज (गोरेगाव) महाविद्यालयाच्या बी. ए. एफ. व बी. बी. आय. विभागातील मुलांनी आयोजित केलेला ‘प्रग्योत्सव’ म्हणजे कॉलेज विश्वातील बहुचर्चित महोत्सव. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून तो नुकताच पार पडला.
‘पायरेट्स आॅफ दी कॅरिबियन’ या हॉलीवूड फिल्म सीरिजच्या थीमवर आधारित प्रग्योत्सवात विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महोत्सवात रंगत आणली. जवळपास सहाहून अधिक महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, फूड फेस्ट, पायरेट्स क्वेस्ट, फोटोग्राफी, मंडला आटर््स, फेस पेंटिंग, चेस, फिफा, पब्जी, वॉर आॅफ इन्स्ट्रुमेंट अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व महाविद्यालयांकडून स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. बेस्ट कॉलेजचे बक्षीस के. ई. एस. कॉलेजने आणि बेस्ट सी.एल.चे बक्षीस दालमिया कॉलेजने पटकाविले. दोन्ही विभागांच्या जवळजवळ १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मिळून आयोजित केलेला प्रग्योत्सव महोत्सव उत्साहाने संपन्न झाला.
दरम्यान, पाटकर महाविद्यालयाच्या प्राचार्या शर्मिष्ठा मटकर, उपप्राचार्या माला खरकर, बीबीआय समन्वयक सुजाता महाजन आणि बीएएफ समन्वयक झेबा खान यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Web Title:  'Pragatotsav' festival celebrated at Patkar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.