पुरोगामी विचारवंतही होते ‘सनातन’च्या टार्गेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:45 AM2018-12-07T05:45:53+5:302018-12-07T05:46:05+5:30

नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यासारखे धर्माबाबत परखड मत मांडणाऱ्या अन्य काही पुरोगामी लेखक, विचारवंतांना कायमची अद्दल घडविण्याचा डाव हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी केला होता.

Pragogami thoughtists were also on the target of 'Sanatan' | पुरोगामी विचारवंतही होते ‘सनातन’च्या टार्गेटवर

पुरोगामी विचारवंतही होते ‘सनातन’च्या टार्गेटवर

googlenewsNext

मुंबई : नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यासारखे धर्माबाबत परखड मत मांडणाऱ्या अन्य काही पुरोगामी लेखक, विचारवंतांना कायमची अद्दल घडविण्याचा डाव हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी केला होता. त्यासाठी त्यांची माहिती जमविण्याचे काम संघटनेच्या वतीने करण्यात येत होते. काही जणांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, असा दावा दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये केला आहे.
या कटाचा मुख्य सूत्रधार कर्नाटकस्थित एम.डी. मुरारी फरारी आहे. त्याच्यासह या कटात सहभागी असलेल्या अन्य तिघा साथीदारांचा अद्याप शोध लागला नसल्याचे आरोपपत्रामध्ये नमूद केले आहे. एटीएसने नालासोपाºयात शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यावर एटीएसने बुधवारी विशेष न्यायालयात जवळपास ६८०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण १६ जणांवर आरोप ठेवले आहेत. १८६ साक्षीदार आहेत. सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधना पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हिंदूविरोधकांना धडा शिकविणे हा हिंदू राष्टÑाच्या निर्मितीच्या कामाचा भाग असल्याची भावना अतिरेक्यांमध्ये होती. त्यातून त्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारखी याचीही अवस्था करायची, असे त्यांनी ठरवले होते. मुरारीने कर्नाटक, महाराष्टÑ, देशभरातील अशा नेत्यांना टप्प्याटप्प्याने संपविण्याचे षड्यंत्र रचले, असा दावा तपास अधिकाºयांनी आरोपपत्रात केला.
नालासोपारा शस्त्रसाठ्यातील मुरारीसह चौघे तपास यंत्रणेला सापडू शकले नाहीत. त्यांच्यावर रेकी, शस्त्र आयात-निर्यात करण्याची जबाबदारी दिली होती, असे तपासात पुढे आले.
>एटीएसचे आरोप निराधार - सनातन
नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी एटीएसने सनातन संस्थेचे साधक व हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक कटात गोवले. क्षात्रधर्म साधना या ग्रंथामध्ये हिंदू राष्टÑ शब्दाचा उल्लेखही नाही, असा दावा सनातन संस्थेने केला आहे. नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटक केलेले कार्यकर्ते हे सनातन संस्थेचे काही कार्यक्रम, आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र ते साधक नव्हते, त्यांचा संघटनेशी थेट संबंध नव्हता, असा दावा संस्थेचे राष्टÑीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

Web Title: Pragogami thoughtists were also on the target of 'Sanatan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.