मुंबई: नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड झाली आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी जुने विवा कॉलेज, विरार (प.) येथे होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो करणार आहेत. या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी दिली आहे.शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी हे संमेलन सुरू झाले. आजपर्यंत अशी आठ संमेलनं यापूर्वी मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी, गोंदिया येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत. कवयित्री नीरजा, डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, प्रवीण बांदेकर, जयवंत पाटील, प्रा. वामन केंद्रे यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. विरार (प.) येथे होणाºया नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात दिवसभर कवी संमेलन, टॉक शो, व्याख्याने असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे, असे जयवंत पाटील यांनी सांगितले.
९ व्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:04 AM