Join us

'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 3:46 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result : शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून राहावं, अडून राहिल्यास शिवसेनेला नक्की मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळाले. तरीसुद्धा सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु शिवसेनेची ही मागणी धुडकावून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मात्र शिवसेना अजूनही मुख्यमंत्री पदासाठी आशादायी असल्याचे दिसून येत आहे. त्यातचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील शिवसेनेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून राहावं, अडून राहिल्यास शिवसेनेला नक्की मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर शिवसेना झुकणार की शहांना शरणगती घेण्यास भाग पाडणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे शिवसेना भाजपाची साथ सोडणार नसल्याचे देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा''

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?

ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

टॅग्स :प्रकाश आंबेडकरउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसअमित शहामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019