मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांपुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. घाटकोपर येथील तानसा पाइपलाइनच्या ‘बफर झोन’ मध्ये असलेल्या बेकायदा झोपडपट्ट्या हटविण्याचे उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही, मेहता यांनी या झोपडपट्ट्यांना संरक्षण दिल्याने त्यांना अटक करावी, अशी विनंती जनहित मंचचे अध्यक्ष व याचिकाकर्ते भगवानजी रयानी यांनी न्यायालयात केली.न्यायालयाने रयानी यांना मेहता यांचे प्रतिज्ञापत्र वाचण्याचा सल्ला दिला. ‘आधी त्यांचे (मेहता) प्रतिज्ञापत्र वाचा व मग कारवाईचा निर्णय घेऊ,’ असे न्यायालयाने म्हटले. मेहता यांनी महापालिकेच्या कार्यात अडथळा आणला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
प्रकाश मेहतांच्या अटकेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:15 AM