#KamalaMillsFire - पहिल्या वीक ऑफमुळे परेलला राहणा-या तेजसचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 15:43 IST2017-12-29T12:34:37+5:302017-12-29T15:43:35+5:30
कमला मील कंपाऊंडच्या ज्या मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटमध्ये अग्नितांडव घडले तिथे तेजस सुर्वे नुकताच नोकरीला राहिला होता.

#KamalaMillsFire - पहिल्या वीक ऑफमुळे परेलला राहणा-या तेजसचे वाचले प्राण
मुंबई - कमला मील कंपाऊंडच्या ज्या मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटमध्ये अग्नितांडव घडले तिथे तेजस सुर्वे नुकताच नोकरीला राहिला होता. परळला राहणारा तेजस सुर्वे ८ डिसेंबरपासून मोजो ब्रिस्टोमध्ये जॉइन झाला होता. काल त्याला पहिल्याच वीक ऑफची सुट्टी होती. त्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच तेजसने लगेच केईएम रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.
कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस या चार मजली इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये सर्वप्रथम आग भडकली. त्यानंतर लगेचच या आगीने रौद्ररुप धारण करत वेगाने ही आग पसरली.
मोजोस बिस्ट्रो पबमधील या घटनेत कोणाचा वाढदिवस अखेरचा ठरला तर कोणाचा स्वप्न अपूर्ण राहिलं. या दुर्घटनेमध्ये यशा ठक्कर नावाच्या 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झालाय.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती. मुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती.
पण त्यानंतर तिथे आग लागली आणि पाहता पाहता आग हॉटेलमध्ये पसरली. आग लागल्यानंतर चुलत बहिणी जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत.