Join us

Prasad Lad On Iqbal Singh Chahal: "कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी तर करण्याचा हेतू नाही ना?"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 8:28 PM

Prasad Lad On Iqbal Singh Chahal: कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. 

मुंबई-

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांच्या घरात पोहोचली असली तरी लॉकडाऊनची सध्या गरज नाही असं विधान करत मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्वांना दिलासा आहे. सिंह यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी चहल आणि पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. 

"महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज केलेलं वक्तव्य म्हणजे प्रशासन आणि शासन याच्यातील तफावत आज पुन्हा एकदा दिसून आली. महापौर वेगळं सांगतायत आणि आयुक्त काहीतरी वेगळं सांगतायत. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या नावाखाली काही वेगळी दुकानदारी चालू करण्याचा तर विचार नाही ना? हा संशय आता सर्वसामान्यांच्या मनात येऊ लागला आहे. आत्पकालीन विभागाची अट घालून सर्व बैठका रद्द करायच्या, हव्या त्या गोष्टी संमत करुन घ्यायच्या आणि जनतेचा पैसा लुटायचा हा आमचा स्पष्ट आरोप आहे", असं प्रसाद लाड म्हणाले. 

एकदा तरी जनतेसमोर सत्य बोलावं"प्रशासन आणि शासनानं एकदा तरी जनतेसमोर येऊन सत्य बोलावं. खरी परिस्थिती दाखवावी. कारण आमच्या माहितीप्रमाणे ओमायक्रॉनमुळे जास्त कुणाची हानी होत नाहीय. औषधं व्यवस्थित गेली पाहिजेत. जनेतेची सेवा व्हायला हवी. रुग्णालयांची उपलब्धता व्यवस्थित व्हायला हवी हाच खरा मुद्दा आहे. सध्या प्रशासन आणि शासनामध्ये जी दुफळी दिसतेय याचा आम्ही निषेध करतो. मुंबईकरांना न्याय द्या त्यांना चांगलं आयुष्य जगू द्या एवढीच माझी प्रार्थना आहे", असं प्रसाद लाड म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले पालिका आयुक्त चहल?मुंबईतील सध्याची रुग्णवाढीची स्थिती पाहाता लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. "मुंबईत काल २० हजाराच्या वर रुग्णसंख्या होती. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजनवर बेडवर आहेत. ११८० लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि शहरात ३५ हजार बेड्सपैकी ५९९९ बेड्स व्यापलेले आहेत. म्हणजेच जवळपास ८४ टक्के बेड्स रिकामी आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर देखील नगण्य आहेत. बेड रिकामी आहेत. त्यामुळ शहरात लॉकडाऊनची गरज नाही", असं चहल यांनी म्हटलं आहे. 

१० दिवसांत रुग्ण कमी होतील "दक्षिण आफ्रिकेत पाच आठवड्यांमध्ये लाट ओसरली. आपल्याकडे आता तिसरा आठवडा संपतो आहे. अजून पुढचे फक्त १० दिवस काढले तर मला खात्री आहे की वाढणाऱ्या केसेस कमी होतील", असा विश्वास इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. तसंच रुग्णांचा आकडा आता महत्त्वाचा राहिलेला नसल्याचंही ते म्हणाले. रुग्णांच्या आकड्यापेक्षा आता तुमच्याकडे किती बेड्स शिल्लक आहेत. हॉस्पीटल्सची, ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन बेडची काय स्थिती आहे हे महत्त्वाचं आहे. रुग्णसंख्या कमी असतानाही जर ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला तर आपण निर्बंधांचा विचार करू, आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही, असं चहल म्हणाले. 

टॅग्स :प्रसाद लाडमुंबईकोरोना वायरस बातम्या