प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण

By मोरेश्वर येरम | Published: December 9, 2020 02:15 PM2020-12-09T14:15:44+5:302020-12-09T14:17:39+5:30

टॉप ग्रूप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती.

pratap sarnaik gets protection from arrest | प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण

googlenewsNext
ठळक मुद्दे"सरनाईक कुटुंबियांची चौकशी करू शकता, अटक करू शकत नाही"शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहेईडीने प्रतास सरनाईक यांना पाठवली होती नोटीस

मुंबई
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनावर सध्या कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिले आहेत.

टॉप ग्रूप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर विहंग सरनाईक यांची चौकशी देखील केली गेली. ईडीने प्रताप सरनाईक यांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. पण सरनाईक यांनी अद्याप ईडीच्या कार्यालयात उपस्थिती लावली नाही. आता सुप्रीम कोर्टाकडून सरनाईक कुटुबियांना अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. 

"कोणतीही कारवाई ही सूडबुद्धीने करू नये. जेव्हा प्रताप सरनाईक यांची चौकशी केली जाईल तेव्हा त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये चौकशीचे व्हिडिओ चित्रिकरण करता येणार आहे. मात्र, चौकशी दरम्यान कोणताही आवाज वकिलांना ऐकू येणार नाही. फक्त पाहता येईल'', असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलावू शकते. पण त्यांना अटक करू शकत नाही, असेही कोर्टाने नमूद केले आहे. 

नेमकं प्रकरण काय?
ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक, त्यांचे सुपुत्र विहंग व पूर्वेश यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर विहंग यांची ईडीकडून पाच तास चौकशी झाली होती. प्रतास सरनाईक यांनाही नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. पण प्रताप सरनाईक परदेशातून परतल्यानंतर आठ दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम असल्याने चौकशीला उपस्थित राहता येणार नसल्याचं सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.  प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाइन कालावधी संपला असून ते ईडीच्या चौकशीला अद्याप सामोरे गेलेले नाहीत. 
 

Read in English

Web Title: pratap sarnaik gets protection from arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.