समुद्रातील प्रथमा, सावनी, रेवा, लक्ष्मी, वनश्री नॉट रिचेबल !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:23 AM2022-12-02T09:23:43+5:302022-12-02T09:24:23+5:30

सॅटेलाइट टॅग केलेल्या समुद्री कासवांशी होईना संपर्क

Prathama, Savani, Reva, Lakshmi, Vanashree not reachable! | समुद्रातील प्रथमा, सावनी, रेवा, लक्ष्मी, वनश्री नॉट रिचेबल !

समुद्रातील प्रथमा, सावनी, रेवा, लक्ष्मी, वनश्री नॉट रिचेबल !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्री कासवांचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्षामार्फत प्रथमा, सावनी, रेवा, लक्ष्मी, वनश्री या पाच कासवांना ट्रान्समीटरद्वारे सॅटेलाईट टॅग केले होते. मात्र, त्या पाचही कासवांचा संपर्क तुटला असून, ट्रान्समीटर निकामी होण्यासह इतर काही तांत्रिक कारणे याबाबत पुढे करण्यात आली आहेत.

दरम्यान, या पाचपैकी चार कासवांनी हजारहून अधिक किमीचे समुद्र अंतर पार केले असून, समुद्री कासवांचा अभ्यास करण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरणार असल्याचा दावा कांदळवन कक्षाने केला आहे.

कोणाला कुठे टॅग केले, कसा झाला प्रवास

धनश्री - १५ फेब्रुवारी रोजी टॅग करण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात तिचा संपर्क तुटला. 

रेवा - १५ फेब्रुवारी रोजी टॅग करण्यात आले होते.

लक्ष्मी - १५ फेब्रुवारी रोजी टॅग करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांतच संपर्क तुटला. 

सावनी, प्रथमा - २५ जानेवारी रोजी टॅग करण्यात आले. २१ एप्रिल रोजी त्यांचा संपर्क तुटला.

Web Title: Prathama, Savani, Reva, Lakshmi, Vanashree not reachable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.