मुंबई : कवी, कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांना २०१८ या वर्षीचा नववा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुपये २५ हजार रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.दर तीन वर्षांनी देण्यात येणारा हा पुरस्कार नावीन्यपूर्ण, प्रयोगशील लेखन करून मराठी साहित्याला नवी दिशा दाखविणाऱ्या लेखकांना दिला जातो. प्रवीण बांदेकर यांनी कवितेने लेखनाला सुरुवात केली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘येरू म्हणे’ २००० साली प्रकाशित झाला. त्यांच्या ‘चाळेगत’ (२००९), ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ (२०१७) आदी कादंबºयाही प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी ललित लेखन, समीक्षा लेखनही केले आहे.
प्रवीण बांदेकर यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:20 AM