मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:10 PM2019-05-13T13:10:44+5:302019-05-13T13:23:18+5:30

प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Praveen Pardeshi is the new BMC chief | मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी

Next
ठळक मुद्देप्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यातील आव्हानं समोर आहेत. मुंबईतील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देणार, नालेसफाईची कामे त्वरीत मार्गी लावणार. मुंबईकरांना यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी

मुंबई - प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा शासन आदेश काढला आहे. 'पावसाळ्यातील आव्हानं समोर आहेत. मुंबईतील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देणार, नालेसफाईची कामे त्वरीत मार्गी लावणार. मुंबईकरांना यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार' असल्याचं प्रवीण परदेशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

इतर अनेक देशांमध्ये ज्याठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे त्या देशांतही कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट आहेत. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करणार. यासाठी कोस्टल रोडबाबत कोळी बांधवांमध्ये असलेली नाराजी दूर करणार, त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे असल्याचं देखील परदेशी यांनी सांगितलं. तसेच विकास आराखड्यावर लक्ष केंद्रीत करणार. अनेक सुचना-हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या विचारात घेऊन काम कर‌णार असं ही त्यांनी म्हटलं आहे. 

प्रवीण परदेशी यांनी घोटाळेबाजांवर कारवाई होणार, पण यात निर्दोष भरडले जाणार नाहीत याचीही काळजी घेणार. अधिकारी जनतेचं काम करण्यासाठी असतात, महापालिकेत  गैरव्यवहार होणार नाही. महापालिकेत सत्ताधारी-प्रशासन यांच्यात संवाद आहे. तो आणखी मजबूत करणार असल्याचं सांगितलं. मुंबई महापालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्तांना नव्या कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. 

2014 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रधान सचिव म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली होती. ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. बेधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचं राज्यातच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झालं होतं. या शाबासकीनं त्यांना नवं बळ मिळालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे, प्रत्येक जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडली आहे. परदेशी यांचा वनांचा दांडगा अभ्यास असून जंगलं जगली पाहिजेत, प्राण्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे, याबाबत ते आग्रही आहेत. 

 

Web Title: Praveen Pardeshi is the new BMC chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.