दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा प्रवीण सावर्डेकर बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 10:42 PM2020-03-11T22:42:19+5:302020-03-11T22:43:01+5:30
रंगतदार झालेल्या शेवटच्या साखळीच्या सामन्यात दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रवीण सावर्डेकरने ग्रेटर को-ऑपरेटिव्ह बँकेचा सुशांत पालकरचा पराभव करून ६ गुण मिळवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले.
मुंबई - को-ऑपरेटिव्ह बँक एम्ल्पॉईज युनियन तर्फे आयोजित ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बँक लिमिटेड तर्फे पुरस्कृत आंतर सहकारी बँक बुद्धिबळ स्पर्धेत दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा प्रवीण सावर्डेकरने विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे ऑफिस, शालिनी पॅलेस, दादर, मुंबई येथे अध्यक्ष माननीय खासदार आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी व सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार श्री. प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आली.
ही बुद्धिबळ स्पर्धा बाद व साखळी पद्धतीने खेळविण्यात आली होती. रंगतदार झालेल्या शेवटच्या साखळीच्या सामन्यात दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रवीण सावर्डेकरने ग्रेटर को-ऑपरेटिव्ह बँकेचा सुशांत पालकरचा पराभव करून ६ गुण मिळवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. प्रवीण सावर्डेकर यांना बुद्धिबळाचे (फिडे) मानांक इलो. १४७६ आहे. तसेच ते बुद्धिबळाचे प्रशिक्षण देत असतात. ग्रेटर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सुशांत पालकरने चार गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला. मुंबई मध्यवर्ती जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलास चौधरीने दोन गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइर्ज युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कार्याध्यक्ष श्री. सुनील साळवी, सरचिटणीस श्री. नरेंद्र सावंत, खजिनदार श्री. प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नंदकुमार रेगे, श्री. प्रकाश वाघमारे, श्री. जनार्दन मोरे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
रंगतदार बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमाला विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे कोंकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेचे कार्याध्यक्ष श्री. असीफ गुलाम मोहम्मद दादन, व को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माननीय खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्री. सुनील साळवी, सरचिटणीस श्री. नरेंद्र सावंत, खजिनदार श्री. प्रमोद पार्टे, उपाध्यक्ष श्री. नंदकुमार रेगे, श्री. यदुवीर पुत्रन, श्री. हाशम धामसकर, श्री. प्रकाश वाघमारे, संयुक्त चिटणीस श्री. नारायण बोरुडे, श्री. मनोहर दरेकर व सहखजिदनार श्री. जनार्दन मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. बक्षिस समारंभाचे सूत्रसंचालन श्री. नंदकुमार रेगे यांनी केले.