प्रवीणसिंह परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:43 AM2021-07-01T10:43:59+5:302021-07-01T10:45:03+5:30

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव रणजित कुमार यांची बदली मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव या पदावर करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ विजय फड हे मराठवाडा विकास मंडळाचे नवे सदस्य सचिव असतील.

Praveen Singh will go on deputation to a foreign center | प्रवीणसिंह परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार

प्रवीणसिंह परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार

googlenewsNext

मुंबई : प्रवीणसिंह परदेशी यांची मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून राज्य शासनाने बुधवारी नियुक्ती केली, पण ते लगेच केंद्रात प्रतिनियुक्तीवर जात आहेत. परदेशी यांच्यासह सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. परदेशी हे आतापर्यंत संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर होते. तेथून परतल्यानंतर ते मराठी भाषा विभागात रुजू झाले. ही नियुक्ती केवळ औपचारिकता असून गुरुवारी ते केंद्र सरकारच्या कर्मयोगी मिशनमध्ये (नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्व्हिसेस कॅपॅसिटी बिल्डिंग) सदस्य म्हणून रुजू होणार आहेत. त्यांचे हे पद  केंद्रीय सचिव दर्जाचे असेल. 

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव रणजित कुमार यांची बदली मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव या पदावर करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ विजय फड हे मराठवाडा विकास मंडळाचे नवे सदस्य सचिव असतील. भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया हे जळगाव जिल्हा परिषदेचे नवे सीईओ असतील. अहेरी; जि. गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी प्रकल्प संचालक असलेले राहुल गुप्ता यांची बदली उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून करण्यात आली. एटापल्ली; जि. गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले मनुज जिंदल हे जालना जिल्हा परिषदेचे नवे सीईओ  असतील. धारणी; जि. अमरावती येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी प्रकल्प संचालक मिताली सेठी यांची बदली चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी करण्यात आली आहे. 
  

 अधिकाऱ्याचे नाव    सध्याचे पद    बदलीचे ठिकाण
१     प्रवीणसिंह परदेशी    युनोमध्ये प्रतिनियुक्ती    अति.मुख्य सचिव मराठी भाषा
२     रणजित कुमार    सचिव, माहिती-तंत्रज्ञान    सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय
३     विजय फड    जि.प.सीईओ, उस्मानाबाद    सदस्य सचिव, मराठवाडा विकास मंडळ
४     डॉ. पंकज आशिया    महापालिका आयुक्त, भिवंडी    जि.प.सीईओ, जळगाव
५     राहुल गुप्ता    सहाय्यक जिल्हाधिकारी, जि. गडचिरोली    जि.प.सीईओ, उस्मानाबाद
६     मनुज जिंदल    सहाय्यक जिल्हाधिकारी, जि.गडचिरोली    जि.प.सीईओ, जालना
७     मिताली सेठी    सहाय्यक जिल्हाधिकारी, जि.अमरावती    जि.प.सीईओ, चंद्रपूर
 

Web Title: Praveen Singh will go on deputation to a foreign center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.