Join us

Video: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:41 PM

व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य केले आहे.

मुंबई: दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. मात्र, प्रवीण तरडे यांनी गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली देशाचे संविधान ठेवल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य केले आहे.

प्रवीण तरडे व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवले होते. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होती. पण, ती खूप मोठी चूक होती. ही चूक मला अनेकांनी फोन करुन निर्दशनास आणून दिली, असं प्रवीण तरडे यांनी सांगितले. यानंतर मी माझी चूक सुधारली असून पुन्हा अशी चूक होणार नाही, असं प्रवीण तरडे यांनी सांगितले.

मित्रांनो चुकून झालेल्या गोष्टी साठी जाहीर माफी ... माझी भावना खुप वेगळी होती .. 🙏🙏🙏

Posted by Pravin Vitthal Tarde on Saturday, 22 August 2020

प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकांच्या मनोऱ्यांवर विठ्ठल, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. 

एका फेसबुक युजरने तरडेंना केसांची वाढ झाल्याने मेंदूची वाढ खुंटली असेल, अशी खोचक टीका केली आहे. तसेच गणपती बाप्पा प्रवीण तरडेंना सद्बुद्धी दे असे आवाहन केले आहे. देशाच्या संविधानाचा अपमान केल्यावरून तरडे ट्रोल झाले आहेत. तरडेंनी मुद्दामहून असा खोडसाळपणा केला असल्याचे आरोप होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडेगणेशोत्सवमहाराष्ट्रसोशल मीडिया