Pravin Darekar On Sanjay Raut : मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजवर गंभीर आरोप केले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर धाडसत्र, छापे सुरू आहेत. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचंही राऊत म्हणाले. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत राऊतांवर निशाणा साधला.
"ज्या पद्धतीनं आमदारांनी, खासदारांनी, नेत्यांनी पाठ फिरवली. मुंबई शिवसेनेचा बेस असताना नाशिकहून गाड्या करून निघाले, पोहोचले अशा प्रकारचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे तोंडावर आपटले. शिवसैनिकांना असा आक्रस्ताळेपणानं वागळं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसमोर भरकटत जाणं हे आवडलेलं नाही," असंही दरेकर म्हणाले.
आरोपांत तथ्य नाही"जिकडे करायला पाहिजे तिकडे काही करायचं नाही. यांना फक्त इव्हेंट करायचंय, भावनिक वातावरण तयार करायचं, लोकांना डायव्हर्ट कसं करायचं यापुढे त्यांच्या आरोपात काडिमात्र तथ्य नाही," असं दरेकर यावेळी म्हणाले. यावेळी राऊत यांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या आरोपवरही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.
"आरोप हा केवळ आरोपापुरता आहे. संजय राऊत यांच्यामुळेच हे सरकार बसलंय. सरकार बसवण्यात सर्वात मोठी भूमिका त्यांचीच आहे. शरद पवार यांना वळवणं, पक्षाला त्यांच्या दावणीला बांधणं संजय राऊत यांनी केलंय. त्यांनी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना सांगितलं तर लगेच अंमलबाजवणी होते. मोहित कंबोज यांच्याविरोधात आरोप करण्याऐवजी तक्रार करा, कारवाई करा. पण यांना त्यात जायचं नाहीये केवळ ढोल पिटायचे आहेत," असंही ते म्हणाले.