महासंचालकपदी प्रवीण दीक्षित यांची निवड निश्चित

By admin | Published: September 29, 2015 03:18 AM2015-09-29T03:18:06+5:302015-09-29T16:21:11+5:30

राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल येत्या बुधवारी (दि.३०) सेवानिवृत्त होत असून त्यांची धुरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित

Pravin Dixit's appointment as Director General | महासंचालकपदी प्रवीण दीक्षित यांची निवड निश्चित

महासंचालकपदी प्रवीण दीक्षित यांची निवड निश्चित

Next

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल येत्या बुधवारी (दि.३०) सेवानिवृत्त होत असून त्यांची धुरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे सोपविली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले जाणार असल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
दयाल हे गेले तीन वर्षे २ महिने पोलीस महासंचालकपदावर असून त्यांच्यानंतर दीक्षित हे राज्यातील जेष्ट अधिकारी आहेत. ते १९७७ सालचे आयपीएस अधिकारी असून गेल्या दोन वर्षापासून एसीबीचे प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. या विभागाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी भ्रष्ट्र व लाचखोर अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधीवर कारवाईचा धडाका लावला आहे.

Web Title: Pravin Dixit's appointment as Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.