प्रवीणा ठाकूर महापौरपदी !

By admin | Published: June 30, 2015 02:59 AM2015-06-30T02:59:14+5:302015-06-30T02:59:14+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांना मिळाला. तर उपमहापौरपदावर बविआचेच उमेश नाईक विराजमान झाले.

Pravina Thakur became the mayor! | प्रवीणा ठाकूर महापौरपदी !

प्रवीणा ठाकूर महापौरपदी !

Next

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांना मिळाला. तर उपमहापौरपदावर बविआचेच उमेश नाईक विराजमान झाले. दोन दिवसांपूर्वी महापौरपदासाठी केवळ दोनच अर्ज आल्यामुळे बविआ आणि सेनेमध्ये सरळ लढत झाली.
तर उपमहापौरपदासाठी दाखल झालेल्या ५ अर्जांपैकी ४ जणांनी माघार घेतल्यामुळे या पदासाठीही सरळ लढत झाली. प्रवीणा हितेंद्र ठाकूर व उमेश नाईक हे प्रत्येकी
१०८ मते घेऊन विजयी झाले, तर सेनेच्या किरण चेंदवणकर व स्वप्नील बांदेकर या दोघांना प्रत्येकी ६ मते पडली. एक अपक्ष उमेदवार गैरहजर राहिला.
महापौरपदासाठी बविआतर्फे प्रवीणा हितेंद्र ठाकूर तर सेनेतर्फे किरण चेंदवणकर या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. आज या दोघांमध्ये सरळ लढत होऊन प्रवीणा ठाकूर यांनी किरण चेंदवणकर यांचा १०२ मतांनी पराभव केला. किरण चेंदवणकर यांना केवळ ६ मते पडली, तर ३ अपक्षांपैकी २ अपक्षांची मतेही बहुजन विकास आघाडीकडे वळली.
उपमहापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीचे उमेश नाईक,
भरत मकवाना, नितीन राऊत,
प्रवीण शेट्टी, प्रशांत राऊत अशा ५ जणांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी उमेश नाईक वगळता इतर सर्वांनी माघार घेतली. सरळ झालेल्या या लढतीत नाईक यांनीही १०८ मते मिळवली. सेनेचे स्वप्नील बांदेकर यांनाही ६ मते मिळाली. निवडून आलेल्या ३ अपक्षांपैकी २ पक्षांनी आपली मते बविआच्या पारड्यात टाकली. १ नगरसेवक मात्र काही कारणास्तव निवडणुकीस उपस्थित राहू शकला नाही. (प्रतिनिधी)

सर्वांना बरोबर घेऊन विकासाला गती देण्याचा माझा प्रयत्न राहील. गेल्या ५ वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. जी काही प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर मार्गी लावू. शहर विकासासाठी केंद्र व राज्य सरकारशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीही उपलब्ध करू. विकासासाठी निधीची चणचण भासणार नाही, असे आश्वासन मी यानिमित्ताने देते. -प्रवीणा ठाकूर, महापौर

पाणीप्रश्न मार्गी लावणार - गेल्या अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे प्रशासनाकडून विकासकामे मार्गी लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार. पाण्याचा प्रश्न येत्या ३ महिन्यांत मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसेच शहर स्वच्छता, आरोग्य व शिक्षण इ. क्षेत्रातील मूलभूत गरजा करदात्यांना योग्य प्रमाणात मिळाव्यात यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहू.
-उमेश नाईक, उपमहापौर

Web Title: Pravina Thakur became the mayor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.