पालिका शाळेत प्रवेश पाडवा
By जयंत होवाळ | Published: June 15, 2024 04:07 PM2024-06-15T16:07:02+5:302024-06-15T16:07:41+5:30
वरळी सी फेस शाळेत पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : मुलांचे औक्षण, गुलाब पुष्प, खुद्द आयुक्त भूषण गगराणी यांची उपस्थिती... अशा आनंददायी वातावरणात शनिवारपासून पालिकेच्या शाळा पुन्हा गजबजल्या. पहिल्याच दिवशी वरळी सी फेस शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे गगराणी यांनी गुलाब पुष्प देत, विद्यार्थ्यांचे आपुलकीने नाव विचारत स्वागत केलं. 'विद्यार्थी प्रवेश पाडवा' आणि 'पहिले पाऊल' या उपक्रमांचा शुभारंभ यावेळी झाला.
वरळी सी फेस शाळेत पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वरळी सी फेस शाळेतील अभिनव आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये इनोव्हेशन लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आदी ठिकाणी गगराणी यांनी भेट दिली. त आहे, याबाबत देखील विचारपूस केली. इनोव्हेशन लॅबच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या प्रयोगाची विद्यार्थी वर्गाला नावीन्यपूर्ण संकल्पना समजून घेण्यासाठी मदत होत आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. खगोलशास्त्र प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील संकल्पना समजण्यास होणारी मदत, त्यातून अंतराळ विषयक वाढणारी आवड, या क्षेत्रासाठीचा विद्यार्थ्यांचा कलही त्यांनी जाणून घेतला.
पहिले पाऊल उपक्रम विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आवडीचा कल शोधणे, हे पहिले पाऊल उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची आवड आणि कल लक्षात घेऊन गट तयार करण्यात येतात. गटातील विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आवडीचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण होणे, शिक्षणाची गोडी लागावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे; त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पालक वर्गाचा सहभाग करून घेणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी, समुपदेशक कक्ष आदीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल तपासण्यात येतो. पालकांसोबत विद्यार्थी विकास या उपक्रमात अपेक्षित आहे.