Join us

कल्याणात मान्सूनपूर्व ेसफाई युद्धपातळीवर

By admin | Published: May 20, 2015 10:49 PM

पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून शहरातील नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला असून या कामांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.

कल्याण : पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून शहरातील नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला असून या कामांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. वास्तविक पाहता हवामान खात्याच्या माहितीवरुन जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात होईल. तरीही अद्याप महापालिका क्षेत्रातील नालेसफाई दिसून येत नसल्याची नाराजी मनसेचे नगरसेवक राहुल चितळे यांनी बुधवारच्या महासभेसमोर व्यक्त केली. सध्याची नाल्यांची तुंबलेली स्थिती आणि मागील अनुभव पाहता यंदातरी नालेसफाई समाधानकारक होईल का, असा सवाल उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले, त्यावर मात्र महासभेने येत्या १५ दिवसात ती कामे यूद्धपातळीवर केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.या वेळेस केडीएमसीतर्फे नालेसफाईच्या कामांवर सुमारे १ कोटी ८५ लाख रुपये खर्च होणार आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपये या कामांसाठी खर्च केले जात असले तरी नालेसफाई समाधानकारक होत नाही. कोट्यवधींचा हा खर्च नालेसफाईच्या माध्यमातून ‘टक्केवारीच्या गटारी’तच जात असल्याचे प्रतिवर्षी पाहावयास मिळते. प्रशासनाकडून सफाईचे कितीही दावे केले जात असले तरी वस्तुस्थिती पाहता त्यांचे दावे फोल ठरतात. अशा असमाधानकारक नालेसफाईवर पालिकेच्या लोकप्रतिनिधींकडून नेहमीच टीका होते, परंतू सुधारणा मात्र होत नसल्याचेही ते म्हणाले. नालेसफाईचे काम कंत्राटदाराला दिल्यानंतर संबंधित कंत्राटदारांवर पालिका अधिका-यांचे नियंत्रण नसते. त्यामुळे नालेसफाईच्या कामांत सर्रासपणे बालमजुरांचा होणारा वापर तसेच काम करणा-या कामगारांना पायात बूट, हॅण्डग्लोव्ह आदी आवश्यक साधने न पुरविणे, हा कंत्राटदाराचा निष्काळजीपणा याआधी दिसून आला आहे. यंदातरी ही परिस्थिती सुधारेल का, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या नाल्यांसह लहान नाल्यांचीही सफाई होणे आवश्यक असल्याची आग्रही भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. (प्रतिनिधी)४केडीएमसी क्षेत्रात लहानमोठे असे ४७ नाले असून यात ४ ते ५ नव्या नाल्यांची भर पडली आहे. नाल्यांची लांबी सुमारे ५0 किमी आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा एक भाग म्हणून नालेसफाईसाठी निविदा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा या कामांसाठी १ कोटी ८५ लाख रुपये खचार्चा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.