Join us

पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मान्सूनपूर्व कामे २५ मेपर्यंत होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:37 AM

एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे.

मुंबई : एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. नालेसफाई, पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हरहेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ही सर्व कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.मागील वर्षी ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत त्या भागात जास्त पंप बसविण्यात येणार आहेत. ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहिम यार्ड,वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागांत जास्त प्रमाणात पाणी साचण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे या स्थानकांवररेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष ठेवून कामे हाती घेतली आहेत. वसई-विरार भागात मागील वर्षी अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे यावर्षी तेथे पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे मान्सूनपूर्वची जोरदार तयारी सुरू आहेचर्चगेट ते विरार उपनगरीय रेल्वे मार्गात एकूण ५३ नाले आहेत. यामधील ३७ नाले खोल करण्याचे काम पहिल्या टप्प्यात होणार आहे. ५३ नाल्यांतील १६ नाल्यांची साफसफाई आणि खोल करण्याचे काम २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य पश्चिम रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचे निरीक्षण वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर १ जूनपासून ते आॅगस्टपर्यंत दुसºया टप्प्यातील साफसफाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.महापालिकेद्वारे मिठी नदी, धारावी नाला, पोईसर नाला इत्यादी मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. नाल्यांची साफसफाई प. रेल्वे आणि पालिका यांच्या संयुक्त निरीक्षणाने केले जाईल.हार्बर मार्गावरील माहिम यार्ड आणि वांद्रे-खार येथील भागात पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण मागील वर्षी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे या वर्षी येथे रेल्वे रुळांना उंचवटा देण्याचे काम केले आहे. वसई-विरार भागात रेल्वे रुळांची उंची २०० एमएमने वाढविण्याचे काम सुरू असून २५ मेपर्यंत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.भरती-ओहोटीच्या वेळापत्रकावर लक्षपश्चिम रेल्वेद्वारे १ जून ते ३० सप्टेंबरमधील भरती आणि ओहोटीच्या वेळापत्रकावर लक्ष देणार आहे. ४.० मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती असल्याच्या तारखांवर लक्ष देऊन त्याप्रमाणे स्थानकांवर पंपांची व्यवस्था, साफसफाईची व्यवस्था, कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.मागील वर्षी ज्या भागात पाणी साचण्याच्या समस्या झाल्या त्या भागात या वर्षी नवीन उपाययोजना राबविण्याचा मानस पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. मान्सूनमध्ये लोकल सेवा ठप्प होऊ नये, यासाठी विशेष कामे पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे केली जात आहेत. ही कामे दोन टप्पांत केली जाणार आहेत. १ जूनपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान दुसºया टप्प्यात कामे केली जाणार आहेत. यामध्ये रेल्वे स्थानकांतील नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था केली जाणार आहे. भुयारी गटारे आणि नाल्यांची खोली वाढविण्याचे आणि साफसफाईची कामे हाती घेतली जाणार आहेत. - रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :पश्चिम रेल्वे