ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून झाली पावसाळापूर्व कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 02:02 AM2020-06-15T02:02:16+5:302020-06-15T02:02:19+5:30
नालेसफाईचे राजकारण; महापालिका म्हणते १०० टक्के झाली नालेसफाई
मुंबई : मान्सून आता मुंबईत दाखल झाला असून, थोडा तरी पाऊस पडला तरी मुंबापुरीची तुंबापुरी होणार आहे. कारण येथील नालेसफाईच पूर्णत: झालेली नाही, असे म्हणत यावर्षीही लोकप्रतिनिधींनी मुंबई महापालिकेवर टिकेची झोड उठविली आहे. पण महापालिकेनेही लोकप्रतिनिधींच्या टीकेला उत्तर दिले आहे. मुंबईतल्या नाल्यांची पुरेशी साफसफाई झालेली नाही, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तर नाल्यांची १०० टक्के कामे झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. या वादात वस्तुस्थिती मात्र समोर येत नसल्याने यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार असल्याचे चित्र आहे.
पालिकेच्या पर्जन्यजल वाहिनीची एकूण कामे ९१ होती. त्यापैकी ९० कामे पूर्ण झाली असून एक काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई शहरांसह दोन्ही उपनगरांत २६३.९१ किलोमीटरची स्वच्छतेची कामे वेळेत करण्यात आलेली आहेत. नाल्यातून २ लाख ५३ हजार ३१६ मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित होते. यावर्षी त्यापेक्षाही जास्त म्हणजे २ लाख ८७ हजार ५१४.३६ मेट्रिक टन गाळ काढण्यात आलेला आहे.
मुंबई शहरांसह दोन्ही उपनगरांत २६३.९१ किलोमीटरची स्वच्छतेची कामे वेळेत करण्यात आलेली आहेत.